शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दहा ग्रामीण रुग्णालयात उभारणार ऑक्सिजन प्लांट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 05:00 IST

पालकमंत्री नवाब मलिक रविवारी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांसोबत संवाद साधला. पंधरा दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात कोविडची परिस्थिती चिंताजनक होती. मात्र आता परिस्थिती बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली आहे. कोविड केअर सेंटर आणि शासकीय रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच ऑक्सिजनयुक्त खाटांची संख्या वाढविल्याने रुग्णांची होणार गैरसोय आता दूर झाली आहे.

ठळक मुद्देनवाब मलिक : कोविड केअरमधील खाटांची संख्या वाढविणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. यात गंभीर रुग्णांचे प्रमाणदेखील अधिक आहे. बरेचदा गंभीर रुग्णांना रेफर करावे लागते. या सर्व अडचणी लक्षात घेता जिल्ह्यातील दहा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येईल. केटीएस आणि पाॅलिटेक्निक कॉलेज येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी वर्कआर्डरसुध्दा काढण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री नवाब मलिक यांनी रविवारी (दि.२) येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.पालकमंत्री नवाब मलिक रविवारी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांसोबत संवाद साधला. पंधरा दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात कोविडची परिस्थिती चिंताजनक होती. मात्र आता परिस्थिती बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली आहे. कोविड केअर सेंटर आणि शासकीय रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच ऑक्सिजनयुक्त खाटांची संख्या वाढविल्याने रुग्णांची होणार गैरसोय आता दूर झाली आहे. येथील जिल्हा क्रीडा संकुलात १२६ खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. रुग्णांची संख्या वाढल्यास येथील खाटांची संख्या १७० पर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. जिल्ह्याला ५ ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर खनिकर्म विभागाच्या निधीतून पुन्हा तीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येतील. जिल्ह्यात आता ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा नसून ते भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. एकंदरीत जिल्ह्यातील कोविड प्रतिबंधात्मक उपाययाेजना पूर्ण झाल्या असून परिस्थिती आटोक्यात असल्याचे सांगितले.  

सहयोग हॉस्पिटलच्या घटनेची चौकशी सुरूसहयोग हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका कोविड बाधित रुग्णाने हाॅस्पिटलच्या तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेची पोलीस विभागांतर्गत चौकशी सुरू असून सीसीटीव्ही फुटेजसुध्दा चेक करण्यात आले आहे. तसेच या रुग्णालयासंदर्भात काही तक्रारी असून त्यांची पोलीस विभागाच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. त्याचा अहवाल प्राप्त होताच कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. रुग्णालयाच्या दर्शनी भागात दरपत्रक अनिवार्यसर्व खासगी कोविड हॉस्पिटलला ते उपचारासाठी आकारत असलेल्या शुल्काचे दरपत्रक हॉस्पिटलच्या दर्शनी भागात लावण्याचे निर्देश देण्यात आले. या निर्देशाचे पालन करणाऱ्या हॉस्पिटलवर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री नवाब मलिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. खरीप हंगामासाठी ३०० कोटी पीक कर्ज येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी अडचण जाऊ नये यासाठी जिल्ह्याला ३०० कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँक या बऱ्याच मागे असतात त्यामुळे या बँकांची बैठक घेऊन आवश्यक सूचना करण्यात येतील. दिलेले उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकावर कारवाई करण्यात येईल. खरीप हंगामासाठी खते, बियाणे यांचा बंफर स्टॉक उपलब्ध असून शेतकऱ्यांना अडचण जाणार नसल्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनcorona virusकोरोना वायरस बातम्या