शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

ओव्हरलोड ट्रक बुडवितात ७२ कोटी

By admin | Updated: November 4, 2016 01:30 IST

देवरीच्या राष्ट्रीय महार्गावरील असलेल्या सिमात तपासणी नाक्यावरून दिवसाकाठी ४ हजार वाहनांची वर्दळ असते.

दररोज ५० ओव्हरलोड ट्रक पत्करतात चोरीचा मार्गनरेश रहिले  गोंदियादेवरीच्या राष्ट्रीय महार्गावरील असलेल्या सिमात तपासणी नाक्यावरून दिवसाकाठी ४ हजार वाहनांची वर्दळ असते. परंतु वाहतूक कर बुडविणारा रॅकेट सक्रिय असल्याने शासनाचे एकाच सिमा तपासणी नाक्यावरून वर्षभरात ७२ कोटीचा महसूल बुडत आहेत. एका दिवसात ५० ओव्हरलोड वाहने चोरीचा मार्ग पत्करून सिमा तपासणी नाके चुकवून ग्रामीण भागातील मार्गाचा अवलंब करीत आहेत. त्यामुळे एका दिवसाला ओव्हरलोड असलेले ५० ट्रक सहजरित्या ग्रामीण भागातील मार्गातून देवरीत येते. देवरी ते नागपूर या दरम्यान तीन नाके आहेत. देवरीच्या शिरपूर येथील सिमा तपासणी नाका, साकोली व मौदा नजीक असे तीन नाके आहेत? परंतु देवरी येथील सिमा तपासणी नाका वगळता त्या दोन नाक्यांवर वजन काटे कार्यरत नसल्याने ओव्हरलोड वाहने देवरीचा सिमा तपासणी नाका चुकविला तर सहजरित्या नागपूरला पोहचतात. यामुळे ट्रक मालकांचा, ट्रान्सपोर्ट मालकांचा फायदा होतो. मात्र शासनाला वर्षाकाठी एका सिमा तपासणी नाक्यावरून ७२ कोटीचा फटका सहन करावा लागतो. देवरी तालुक्याच्या सिरपूर येथे असलेल्या सिमा तपासणी नाक्याला चुकवून रायपूर वरून नागपूरला किंवा नागपूर वरून रायपूरला जाण्यासाठी दिवसाकाठी ५० च्या घरात ट्रक देवरी मार्गे ककोडी होत बुडीबंजारा किंवा हळदी होत छत्तीसगडमध्ये जातात. रायपूर कडून नागपूरकडे धावणारे ओव्हरलोेड ट्रक शिरपूर सिमा तपासणी नाक्याच्या पूर्वीच छत्तीसगडच्या हद्दीत जेसीबी किंवा क्रेनच्या माध्यमातून माल उतरवून त्या मालाला हळदी किंवा बुडीबंजारा मार्गे ककोडी होत देवरीत आणले जाते. देवरीतून राष्ट्रीय महामार्गाने नागपूरला नेतात. ओव्हरलोड ट्रक ग्रामीण मार्गाचा वापर करून दिवसाकाठी ५० ट्रक सिमा तपासणी नाक्याचा कर चुकवित आहेत. त्यामुळे एका दिवशी २० लाखाचा महसील बुडत आहे. एका ओव्हरलोड ट्रकमध्ये कमीत कमी २० टन माल अधिक असतो. सिमा तपासणी नाक्यावर ओव्हरलोड ट्रक पकडले तर प्रत्येक टन माला मागे २ हजार रूपये दंड आकारला जातो. हा दंड वाचविण्यासाठी ओव्हरलोड ट्रक ग्रामीण भागातील मार्गाचा अवलंब करतात. महिन्याकाठी १५०० ट्रक चोरीच्या मार्गाने वाहतूक करीत असल्याने महिन्याकाठी ६ कोटी तर वर्षाकाठी ७२ कोटीचा महसूल बुडत आहे. तीन पथके हवीतया ओव्हरलोड वाहनांना पकडण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात कमीत कमी तीन वायू वेग पथक असायला हवेत. परंतु जिल्ह्यात एकच पथक आहे. या वाहनाला शासनाने दिलेले वाहन आजघडील मोडकडीस आले आहे. ३ लाख किमी चाचलेले भंगार वाहन या पथकाला आहे. त्यामुळे ओव्हरलोड ट्रकचाही पाठलाग हे वाहन करू शकत नाही. ते वाहन कधीच बंद पडते. २४ तास सेवा देण्यासाठी तीन पथक तयार करण्याची गरज आहे. वजन काटे कार्यरत करादेवरी सिमा तपासणी नाका वगळता साकोली व मौदा येथे सिमा तपासणी नाके आहेत. या नाक्यावर वजन काटे आहेत परंतु ते काटे बंद असल्याने ओव्हरलोड ट्रकांना या नाक्यांवरून अभय आहे. फक्त देवरीचा सिमा तपासणी नाका चुकवा व लक्ष गाठा हा उपक्रम ट्रान्सपोर्ट मालकांचा आहे. देवरीच्या सिमा तपासणी नाका चुकवला तर वर्षाकाठी ७२ कोटीचा शासनाचा महसूल बुडतो तर महाराष्ट्रातील २२ नाके घेतले तर हजारो कोटी रूपये शासनाचा महसूल बुडत आहे.अशी आहे क्षमतासहा चाकी ट्रक १० टन, १० चक्का ट्रक १६ टन, १४ चक्का ट्रक २५ टन, १८ चक्का ट्रक ३० टन व २२ चक्का ट्रेलर ४० टन पर्यंत माल वाहून नेऊ शकतो. परंतु क्षमतेपेक्षा २० ते २५ टन माल टाकून वाहतूक केली जाते. त्याचा दंड चुकविण्यासाठी ग्रामीण मार्गाचा अवलंब केला जात आहे. १७ महिन्यात ३.३१ कोटी दंड वसूलओव्हरलोड असलेल्या ट्रकचालकांकडून दंड वसूल करण्यात आला. २०१५-१६ या आर्थिक वर्षात ४०६३ ट्रक ओव्हरलोड मिळाले. त्यांच्याकडून २ कोटी १७ लाखचा दंड वसूल करण्यात आला. सन २०१६ च्या एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यात एक कोटी १४ लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहे.