शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मागील २४ तासांत तीन महसूल मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 22:09 IST

जिल्ह्यात बुधवारी (दि.२७) दुपारी सुरू झालेल्या पावसाची रिपरिप गुरूवारी (दि.२८) दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कायम होती. जिल्ह्यातील काही भागात चांगला पाऊस झाला.

ठळक मुद्देरिमझिम पाऊस सुरूच : सरासरी ३७ मिमी पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात बुधवारी (दि.२७) दुपारी सुरू झालेल्या पावसाची रिपरिप गुरूवारी (दि.२८) दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कायम होती. जिल्ह्यातील काही भागात चांगला पाऊस झाला. मागील २४ तासात सरासरी ३७ मिमीे पावसाची नोंद झाली असून तीन महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.ज्या तीन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंद झाली. त्यात देवरी येथे सर्वाधिक ७९ मिमी, सडक-अर्जुनी येथे ८० मिमी व डव्वा येथे ७४.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने जिल्ह्यातील पेरणीची कामे पूर्ण खोळंबली होती. २५ जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ ३ टक्के पेरण्या झाल्या होत्या. तर पावसाअभावी पेरणी केलेले धानाचे पºहे सुध्दा वाळण्याच्या मार्गावर होते.त्यामुळे दुबार पेरणी तर करावी लागणार नाही ना अशी चिंता शेतकऱ्यांना सतावित होती. पाऊस न झाल्यामुळे उकाडा वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. बुधवारी दुपार पासूनच सुरू झालेल्या पावसाची रिपरिप गुरुवारी दुसऱ्या दिवशी सुध्दा कायम होती. पावसामुळे धानाचे पऱ्हे व इतर पिकांना सुध्दा संजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. सडक-अर्जुनी तालुक्यामध्ये केवळ तीन महसूल मंडळे आहेत. त्यापैकी सडक-अर्जुनी व डव्वा या दोन्ही मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या तालुक्यात ७२.४१ मिमी पावसाची नोंद झालीे. इतर महसूल मंडळांमध्ये जेथे चांगला पाऊस झाला आहे. त्यात सौंदड ६३.०४ मिमी, तिगाव ५१.४, चिचगड ४१, महागाव ४६.२, बोंडगावदेवी ४१.३, ठाणेगाव ४३.७, वडेगाव ५९.४, तिरोडा ५३.२, गोंदिया ५८, रावणवाडी ५५ व रतनारा मंडळात ४५ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट काही प्रमाणात टळले असले तरी अद्यापही शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Rainपाऊस