शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

रेती उत्खननादरम्यान दफन केलेले मृतदेह बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2022 05:00 IST

आमगाव तालुक्यातील मानेकसा येथील घाटावर  रेती उत्खनन केले जाते. त्या ठिकाणी रेती उपसा करताना दोन प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दफन केलेले  मृतदेह रेती उत्खननादरम्यान बाहेर येत असून, अवैध उत्खनन करणारे मात्र याकडे दुर्लक्ष  करून रेतीची तस्करी करीत  असल्याची माहिती आहे.

राजीव फुंडे लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : महसूल विभागांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील मानेकसा  घाटावर मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन केले जात आहे. रेतीच्या उत्खननादरम्यान नदीच्या काठावर दफन केलेले  मृतदेह जमिनीबाहेर येत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या प्रकाराची गावकऱ्यांनी महसूल विभागाकडे तक्रार केली आहे. आमगाव तालुक्यातील मानेकसा येथील घाटावर  रेती उत्खनन केले जाते. त्या ठिकाणी रेती उपसा करताना दोन प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दफन केलेले  मृतदेह रेती उत्खननादरम्यान बाहेर येत असून, अवैध उत्खनन करणारे मात्र याकडे दुर्लक्ष  करून रेतीची तस्करी करीत  असल्याची माहिती आहे. मानेकसा रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन केले जात असल्याची माहिती आहे.  महसूल विभागानेसुद्धा या रेती घाटावरून  रेतीची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, यानंतरही  रेतीचे अवैध उत्खनन सुरूच आहे. विशेष या परिसरातील गावकरी हे मानेकसा घाटावरच मृतदेहावर अंत्यसंस्कार व दफनविधी करतात. मात्र, रेतीचे तस्करी करणारे या घाटावरून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी करीत असल्याने या रेती घाटावरून कुठूनही रेतीचे उत्खनन करीत आहेत. परिणामी या घाटावर दफन केलेले मृतदेह बाहेर येत आहेत. त्यामुळे महसूल विभागाने या प्रकाराकडे लक्ष देऊन अवैध रेती तस्करीला आळा घालण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. 

मानेकसा येथे याच घाटावर अंत्यसंस्कार केले जातात. काही जण नदीकाठी मृत व्यक्तीचा दफनविधी करतात. मात्र, रेती उत्खननादरम्यान दफन केलेले मृतदेह बाहेर आले याची आपल्याला माहिती नाही. यासंदर्भात माहिती घेतो.- मिलिंद मेश्राम, पोलीस पाटील, मानेकसा

मानेकसा येथील रेती घाटावर आपण प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा करणार आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश संबंधित कर्मचाऱ्यांना दिले आहे. अवैध रेती तस्करीला पूर्णपणे आळा घातला जाईल. -अनमोल सागर, उपविभागीय अधिकारी, देवरी

 

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करी