शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

गोंदिया तालुक्यात कोरोनाचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 05:00 IST

जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे याला वेळीच प्रतिबंध लावण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. अन्यथा पुन्हा कडक निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते. ही वेळ येऊ द्यायची नसेल, तर सर्वांनी नियमित मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील चार दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यातच गोंदिया तालुक्यातील बाधितांच्या संख्येत भर पडत असल्याने या तालुक्यातील कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४१ वर पोहोचली आहे. त्यामुळे गोंदिया तालुक्यात कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी जिल्ह्यात १० कोरोना बाधितांची भर पडल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ६४ वर पोहोचली आहे.कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने शिरकाव केला आहे, तर मागील चार दिवसांपासून कोरोना बाधितांचा आलेख सातत्याने वाढत असल्याने चिंता वाढविली आहे. बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्यात तिसऱ्या लाटेने प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सुध्दा सतर्क बनली आहे. कोराेना संसर्गाच्या अनुषंगाने गुरुवारी (दि. ६) एकूण ६९६ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यात ६०१ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ९५ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात १० नमुने कोरोनाबाधित आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट १.४४ टक्के आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ४७४२५२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यात २४९५३६ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर २२०४७१ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४१८१३ नमुने कोरोनाबाधित आढळले, तर यापैकी ४०५३१ बाधितांनी कोरोनावर मात केली असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ६४ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर एका बाधिताने गुरुवारी कोरोनावर मात केली. 

नागरिकांनो नियमांचे करा पालन... - जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे याला वेळीच प्रतिबंध लावण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. अन्यथा पुन्हा कडक निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते. ही वेळ येऊ द्यायची नसेल, तर सर्वांनी नियमित मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. 

प्रतिबंधात्मक लस घ्या - कोरोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण हेच महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घ्यावे. १५ ते १८ वयोगटातील मुलांचेसुद्धा लसीकरण सुरू असून सर्वांनी आपल्या पाल्यांना आर्वजून लस द्यावी. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या