शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
2
“काँग्रेसनेच संविधान कलंकित केले, मतचोरी करून इंदिरा गांधींचा रायबरेलीत विजय”: निशिकांत दुबे
3
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
4
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
5
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
6
कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले
7
प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न
8
हृदयद्रावक! आंघोळीला गेला, जीव गमावला; गीझर बनला सायलेंट किलर, तरुणासोबत घडलं आक्रित
9
Jara Hatke: फुटक्या कवडीची खरी किंमत माहितीय? प्राचीन चलनव्यवस्थेशी आहे थेट संबंध 
10
"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला
11
‘वंदे मातरम्’चे दोन तुकडे केले नसते तर देशाची फाळणी झाली नसती, अमित शाहांची नेहरूंवर टीका 
12
Puja Rituals: उदबत्तीची रक्षा, जळलेल्या वाती तुम्ही कचऱ्यात तर फेकून देत नाही ना? 
13
महिला पडली तरुणाच्या प्रेमात, बकरी चरायला नेण्याच्या बहाण्याने झाली घरातून पसार, त्यानंतर...
14
गोव्यातील 'त्या' क्लब मालकांची अवैध मालमत्ता पाडण्याचे आदेश; कारवाई टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणला होता दबाव
15
'इंडिगो'मुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फटका! ८ दिवसांत १७,६६० कोटींचे नुकसान; मुच्युअल फंडही तोट्यात
16
“दादा रुसून कधी बारामतीला निघून गेले नाहीत, महाराष्ट्रात अजितपर्व येईल”; कुणी केला दावा?
17
Kitchen Tips: गॅस सिलेंडरची नळी कधी बदलायची? स्फोट टाळण्यासाठी माहीत हवे 'हे' नियम!
18
Sydney Sweeney: सिडनी स्वीनीच्या हॉटनेसपुढं सगळंच फिकं, फोटो पाहून चाहते झाले घायाळ
19
सोनिया गांधी नागरिकत्व घेण्याआधीच कशा बनल्या मतदार? १९८० च्या मतदार यादीवरून कोर्टाने बजावली नोटिस
20
तगडा अभिनय तरीही 'धुरंधर'साठी अक्षय खन्नाला रणवीरपेक्षा खूपच कमी मानधन; मिळाले फक्त 'इतके' पैसे
Daily Top 2Weekly Top 5

आपले सरकार नव्हे घोषणाबाज सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 01:17 IST

आमचे सरकार सत्तेवर आल्यास दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ, महागाई नियंत्रणात आणू, विदेशातील काळा पैसा परत आणू, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफा जोडून भाव देऊ, सिंचन प्रकल्प मार्गी लावू अशा घोषणा केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारने केल्या होत्या.

ठळक मुद्देअशोक चव्हाण : जनसंघर्ष यात्रेचे गोंदियात जोरदार स्वागत, सभेला जिल्हाभरातील नागरिकांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमचे सरकार सत्तेवर आल्यास दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ, महागाई नियंत्रणात आणू, विदेशातील काळा पैसा परत आणू, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफा जोडून भाव देऊ, सिंचन प्रकल्प मार्गी लावू अशा घोषणा केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारने केल्या होत्या. मात्र मागील साडेचार वर्षांत यापैकी एकाही आश्वासनाची पुर्तत: केली नाही. देश व राज्यात नेमके याविरुध्द चित्र आहे. सरकारने आपले सरकार असल्याचे सांगून जतनेची सहानूभुती मिळवून घेतली. मात्र आता त्याच जनतेचा सरकारला विसर पडला असून हे आपल सरकार नव्हे तर केवळ घोषणाबाज सरकार होय असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली असल्याचे प्रतिपादन महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे शेतकºयांना सरसकट कर्जमाफीसह अन्य मागण्यांना घेवून राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली. ही जनसंघर्ष यात्रा आज (दि.११) सकाळी गोंदिया येथे दाखल झाली. या यात्रेचे जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर येथील सुभाष स्कुलच्या मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते. सभेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे विधानसभा उपनेते विजय वडेट्टीवार, आ.नसीम खान, गोपालदास अग्रवाल, माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी आ.आशिष देशमुख, माजी आ.सेवक वाघाये, रामरतन राऊत, काँग्रेस सेवादलचे प्रदेशाध्यक्ष विलास अवताळे, जनसंघर्ष यात्रेचे संयोजक आशिष दुआ, एनएसआयुचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख, बबनराव तायवाडे, जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष उषा सहारे, अतुल लोंढे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, सहसराम कोरोट, उषा मेंढे, विमल नागपुरे, प्रकाश रहमतकर, आलोक मोहंती, हरिष तुलस्कर, पन्नालाल शहारे, रमेश अंबुले उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर येताच शेतकºयांना कर्जमाफी आणि धानाला २५०० रुपये प्रती क्विंटल हमीभाव जाहीर केला. मग महाराष्ट्र सरकारला काय अडचण आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकरी त्रस्त झाला असून मागील चार वर्षांत देशात १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे या सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. या सरकारच्या धोरणामुळे केवळ शेतकरी नव्हेच तर विद्यार्थी, शैक्षणिक संस्था सुध्दा त्रस्त झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळत नसून आदिवासी आश्रम शाळा,मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शाळा बंद होत आहेत. त्यामुळे या सरकारला भीक लागली असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. प्रास्तविक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे यांनी मांडले. संचालन शहर काँग्रेस कमिटीचे महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी केले.नोटबंदीने गरिबांच्या बचतीवर डल्लामोदी सरकारने देशात नोटबंदी लागू करुन गोरगरिबांच्या बचतीवर डल्ला मारण्याचे काम केले. नोटबंदीचा कुठलाच फायदा झाला असून उलट यामुळे रोजगार आणि उद्योगावर परिणाम झाला. सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. तर भाजप-सेना सरकारचा वेळ केवळ भांडणात गेला असून त्यांना शेतकरी जनतेच्या प्रश्नांशी काही घेणे देणे नसल्याचा आरोप माणिकराव ठाकरे यांनी केला.बहुत हुई मंहगाई मार भाग जाओ मोदी सरकारसाडेचार वर्षांपूर्वी ४५० रुपयाला मिळणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी आता १०५० रुपये मोजावे लागत आहे. ५५ रुपये किलोचे खाद्य तेल ९० रुपयांवर पोहचले आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये दररोज वाढ होत आहे. तर शेतमालाल भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत असून वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे बहुत हुई मंहगाई मार भाग जाओ मोदी सरकार असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली असल्याचे नसीम खान म्हणाले.पटोलेंच्या अनुपस्थितीची चर्चामहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेदरम्यान गोंदिया जिल्ह्यात दोन ठिकाणी शुक्रवारी (दि.११) जाहीरसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र सभेच्या फलकावर आणि मंचावर सुध्दा काँग्रेसच्या अखिल भारतीय किसान मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खा.नाना पटोले उपस्थिती नव्हते. शेतकºयांच्या मुद्दावरच ही जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून यात पटोलेच न दिसल्याने सभास्थळी याची जोरदार चर्चा होती.मोदी फेकू तर फडणवीस फसणवीसकेंद्र व राज्यातील सरकार केवळ घोषणबाज सरकार असून एक देशाला तर दुसरा राज्याला फसवित आहे. मनमोहनसिंग सरकारच्या काळात ७० हजार कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी जाहीर केली होती. तर फडणवीस सरकारचा अद्यापही अभ्यासच सुरू आहे. साडेचार वर्षांपुर्वी पांढऱ्या दाढीचा एक बुवा रोज टीव्हीवर यायचा आणि मोठी आश्वासने देऊन जायचा. मात्र मागील साडेचार वर्षांत एकाही आश्वासनाची पुर्तत: झाली नसून मोदी फेकू तर फडणवीस फसणवीस सरकार असल्याची टिका विजय वडेट्टीवार यांनी केली.सरकारला घरचा रस्ता दाखवाआम्ही सत्तेवर आल्यास शेतकरी हिताची धोरणे राबवू असे आश्वासन भाजप सरकारने दिले होते. मात्र प्रत्यक्षात या विरोधात चित्र आहे. धानाच्या हमीभावात वाढ दूरच उलट धान खरेदीवर मर्यादेचे बंधन घातले. तर अद्यापही बोनसचा पत्ता नाही. कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्यांना रांगेत उभे करण्याचे काम केले. मात्र कर्जमाफीचा लाभ पूर्ण शेतकऱ्यांना मिळालेला नाही. सरकारकडून होणारी शेतकऱ्यांची लूट बंद व्हावी त्यांचा सन्मान व्हावा यासाठी केंद्र व राज्यातील सरकार उलथून टाकून त्यांना घरचा रस्ता दाखविण्याचे आवाहन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल