शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जलसंकट दूर करणे आमचे प्रथम लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 22:17 IST

आज संपूर्ण जगात पाणी टंचाई भासत आहे. मानवी जीवनात पाण्याचे खूप महत्व आहे. पाण्याशिवाय मनुष्य जीवनाची कल्पनाच करता येत नाही. त्यामुळेच गोंदिया विधानसभा क्षेत्रात जलसंकटावर मात करणे, आमचे प्रथम लक्ष्य आहे, ....

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : हिवरा येथे पाणी पुरवठा योजनेच्या बांधकामाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आज संपूर्ण जगात पाणी टंचाई भासत आहे. मानवी जीवनात पाण्याचे खूप महत्व आहे. पाण्याशिवाय मनुष्य जीवनाची कल्पनाच करता येत नाही. त्यामुळेच गोंदिया विधानसभा क्षेत्रात जलसंकटावर मात करणे, आमचे प्रथम लक्ष्य आहे, असे प्रतिपादन आ. गोपालदास अग्रवाल यांनी केले.आ. अग्रवाल यांच्या प्रयत्नांनी ८० लाख रूपयांच्या खर्चाचे मंजूर ग्राम हिवरा येथे पेयजल पुरवठा योजनेच्या नवीन जलस्त्रोतांर्गत विहीर व पुरवठा पाईप लाईन बांधकाम, तीन लाखांच्या आमदार निधीतून मंजूर राणी अवंतीबाई स्मारकाजवळ सभामंडप बांधकाम व तीन लाखांच्या निधीतून मंजूर जनसुविधा योजनेंतर्गत स्मशान रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आ. गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष सीमा मडावी होते. अतिथी म्हणून जि.प. सभापती रमेश अंबुले, जि.प. सभापती लता दोनोडे, पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, पं.स. उपसभापती चमन बिसेन, प्रकाश रहमतकर, कृउबासचे उपसभापती धनलाल ठाकरे, सरपंच सजिव लिल्हारे, उपसरपंच विशाल साखरे, ग्रा.पं. सदस्य फुलचंद बन्नोटे, श्वेता वंजारी, माधुरी धारणे, प्रमिला भास्कर, तरूणा साखरे, सरोज लिल्हारे, कनेरलाल पिसोडे, राजेशसिंग परिहार, पोलीस पाटील विनोद नंदेश्वर, फागुलाल माहुले, सूर्यभान टेंभुरकर, सुखदेव ढोमणे, डॉ.एम.बी. ठाकरे, तेजलाल गहगये, जिवनलाल लिल्हारे, अरविंद धमगाये, रंजित नंदेश्वर, श्यामकुवर अंबादे, आनंद बनोटे, राजेंद्र दरवडे, खिमनलाल माहुले, साहेबलाल पिसोडे, मनोहरलाल पिसोडे, शिवचरण पिसोडे, मनोज शहारे, खुमेश ठाकरे उपस्थित होते.आ. अग्रवाल पुढे म्हणाले, गोंदिया विधानसभा क्षेत्रात विकास कार्यांसहच पाणी पुरवठ्यासाठी शासनाच्या योजनांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत.तसेच परिसरातील शेतकऱ्यांना अधिकाधिक सिंचन सुविधा मिळाव्या यासाठी बाघ प्रकल्पाच्या सर्वच कालव्यांचे दुरूस्ती कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भविष्यात या सर्व कालव्यांतून प्रत्येक शेतकºयाला सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी प्रयत्नशील आहोत.रस्त्यांच्या विकासावर बोलताना ते म्हणाले, रस्त्यांच्या विकासाकडे आमचे सर्वाधिक लक्ष असते. जेथे रस्ते नाही, तेथे नाते नाही व रस्त्यांच्या माध्यमातूनच परिसरात समृद्धी येते, असे त्यांनी सांगितले.या वेळी जि.प. अध्यक्ष सीमा मडावी म्हणाल्या, सतत विकास कामे आणून या क्षेत्राला सुजलाम सुफलाम करण्याचे आ. अग्रवाल यांचे धोरण आहे. मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता त्यांनी केली आहे.राज्यात कोणत्याही पक्षाची सरकार असो, गोंदिया विधानसभा क्षेत्रातील विकासाची गती थांबली नाही. राज्य व केंद्र शासनाच्या विकासाच्या योजनांना शासनाशी संघर्ष करून आपल्या क्षेत्रातील नागरिकांपर्यंत पोहोचविल्या, असे त्या म्हणाल्या.या वेळी सरपंच संजिव लिल्हारे, धनलाल ठाकरे यांनीसुद्धा आपल्या मार्गदर्शनात आ. अग्रवाल यांनी केलेल्या विकास कार्यांवर प्रकाश टाकला.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल