शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय शेती शेतकऱ्यांसाठी वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 01:04 IST

शेतजमिनीतून मोठ्या प्रमाणात पीक उत्पादन होण्यासाठी शेतकरी रासायनिक खते, विविध किटकनाशक औषधांचा वापर करीत आहे. आवश्यकतेपेक्षा अधिक रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीची पोत कमी खालावत चालली आहे.

ठळक मुद्देविलास कोहाडे : प्रशिक्षण कार्यक्रमात माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : शेतजमिनीतून मोठ्या प्रमाणात पीक उत्पादन होण्यासाठी शेतकरी रासायनिक खते, विविध किटकनाशक औषधांचा वापर करीत आहे. आवश्यकतेपेक्षा अधिक रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीची पोत कमी खालावत चालली आहे. त्याचाच परिणाम जमिनीच्या आरोग्यावर होत आहे. या बाबीवर मात करण्यासाठी तसेच आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सेंद्रिय शेती शेतकºयांसाठी वरदान असल्याचे प्रतिपादन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे यांनी केले.बुधेवाडा येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी-मोरगाव व आत्मा यांच्या विद्यमाने आयोजित सेंद्रिय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रीय शेती) सन २०१८-१९ अंतर्गत बुधेवाडा येथे ५० शेतकºयांचा गट स्थापन करुन त्या शेतकºयांना आत्मा व कृषी विभागामार्फत सेंद्रीय शेती संबंधी प्रशिक्षण देण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक घनशाम चचाणे, कृषी सहायक भारती येवले उपस्थित होते. सेंद्रीय शेती प्रशिक्षणात सहभागी झालेल्या शेतकºयांना मार्गदर्शन करताना कोहाडे म्हणाले, दिवसेंदिवस शेतीस लागणाऱ्या खतावरील खर्च वाढत आहे.रासायनिक खते व औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने जमिनीचे आरोग्य खालावले, पाणी दूषीत झाले तर वातावरणावर त्याचे विपरीत परिणाम होत आहे. उत्पादीत शेतमाल विषयुक्त निर्माण झाल्याने त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. यावर रामबाण उपाय सेंद्रीय शेती हे असल्याचे सांगून त्यांनी सेंद्रीय शेतीचे महत्व, फायदे सेंद्रीय अन्नधान्याची मागणी, रासायनिक खते, औषधी यापासून होणारे दुष्परिणाम सांगीतले. तसेच यासाठी शासनातर्फे दिल्या जाणाºया अनुदानाची माहिती दिली. घनशाम चचाणे यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे दर्शनी अर्क, जीवामृत, बिजामृत कसे तयार करायचे ते प्रशिक्षणार्थ्यांना करुन दाखविले. कृषी सहायक भारती येरणे यानी सेंद्रीय शेती शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी असल्याचे सांगितले.

टॅग्स :agricultureशेती