शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आदेश निघाले; पण मोफत रेती मिळणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 05:00 IST

जिल्ह्यात सन २०२०-२१मध्ये रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत एकूण ३७,६४० घरकुल मंजूर करण्यात आले. या लाभार्थींना पहिला आणि दुसरा हप्ता देण्यात आला. मात्र मागील वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आला, तर राज्य पर्यावरण समितीची मंजुरी न मिळाल्याने रेतीघाटांच्या लिलावाची प्रक्रिया रखडली. त्यामुळे घरकुल बांधकामासाठी रेती मिळणे कठीण झाले.

ठळक मुद्देलाभार्थी करीत आहेत पंचायत समितीची पायपीट : चार रेतीघाट केले राखीव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षी रेतीघाटांचे लिलाव झाले नाही त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव झाला, त्यामुळे लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी रेतीघाटांच्या लिलावाची प्रक्रिया पुन्हा लांबली. दरम्यान, घरकुल लाभार्थींची परवड होऊ नये यासाठी शासनाने घरकुल लाभार्थींना पाच ब्रास मोफत रेती वाटप करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भातील आदेश जिल्हा खनिकर्म विभागाने काढले. पण यानंतरही घरकुल लाभार्थींना मोफत रेती मिळणे कठीण झाले आहे.जिल्ह्यात सन २०२०-२१मध्ये रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत एकूण ३७,६४० घरकुल मंजूर करण्यात आले. या लाभार्थींना पहिला आणि दुसरा हप्ता देण्यात आला. मात्र मागील वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आला, तर राज्य पर्यावरण समितीची मंजुरी न मिळाल्याने रेतीघाटांच्या लिलावाची प्रक्रिया रखडली. त्यामुळे घरकुल बांधकामासाठी रेती मिळणे कठीण झाले. परिणामी हजारो घरकुल लाभार्थींचे घरकुल बांधकाम रखडले आहेत. त्यामुळे त्यांची देयकेसुद्धा रखडली होती. यावर तोडगा काढत शासनाने घरकुल लाभार्थींना पाच ब्रास रेती मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. यासाठी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, आमगाव, गोंदिया येथील चार रेतीघाट राखीव ठेवण्यात आले. तिरोडा तालुक्यात रेतीचे वितरणसुद्धा करण्यात आले. मात्र मागील काही दिवसांपासून पुन्हा ही प्रक्रिया रखडली असून, लाभार्थींना रेती मिळणे कठीण झाले आहे. वाळूचे दर गगनाला जिल्ह्यात रेतीघाटांचे लिलाव रखडल्याने रेती मिळणे कठीण झाले आहे. अशात रेतीमाफिया अतिरिक्त दराने रेतीची विक्री करीत आहे. रेतीचा प्रतिब्रास दर सध्या आठ हजार रुपये आहे. त्यामुळे अनेकांना गरजेपोटी रखडलेले बांधकाम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजून रेतीची खरेदी करावी लागत आहे. रेतीचे भाव गगनाला भिडले असल्याने गोरगरीब घरकुल लाभार्थींना त्याचा फटका बसत आहे, तर रेतीमाफिया गब्बर होत असल्याचे चित्र आहे.  

केवळ सहा घाटांचे लिलाव जिल्ह्यात एकूण २७ रेतीघाट असून, यापैकी राज्य पर्यावरण समितीची मंजुरी मिळालेल्या दहापैकी सहा रेतीघाटांचे लिलाव नुकतेच करण्यात आले. मात्र त्यांचीसुद्धा प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे, तर काही तालुक्यात एकाही रेतीघाटाचा लिलाव झाला नसल्याने बांधकाम करणाऱ्यांना रेती मिळणे कठीण झाले आहे.  

रकुलाचे बांधकाम अर्धवट झाले असून, रेती मिळत नसल्याने बांधकाम पूर्ण कसे करावे, असा बिकट प्रश्न निर्माण   झाला आहे. त्यामुळे देयकसुद्धा मिळत नसून आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे.- कारणबाई बोपचे, इंदोरा बु. (घरकुल लाभार्थी)तहसील कार्यालयाने घरकुल लाभार्थींना पिपरिया रेतीघाटांवरून रेती उपलब्ध करून दिली होती. मात्र या रेतीघाटाचा रेतीसाठा संपल्याने अद्यापही दुसऱ्या घाटावरून रेती उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे आमचे घरकुलाचे बांधकाम रखडले आहे.- संगीता ठाकरे, इंदोरा बु. (घरकुल लाभार्थी)

टॅग्स :sandवाळू