शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

बालमृत्यू प्रकरणाच्या चौकशीचे आदेश

By admin | Updated: June 5, 2017 00:56 IST

मागील दीड महिन्यात ३४ नवजात बाळांचा मृत्यू झाल्याप्रकरणी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गुरूवारी (दि.१) येथील बाई गंगाबाई रूग्णालयाची पाहणी करून ...

डॉक्टरांची केली कानउघडणी : बीजीडब्ल्यू रुग्णालयाची पटेलांनी केली पाहणी लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील दीड महिन्यात ३४ नवजात बाळांचा मृत्यू झाल्याप्रकरणी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गुरूवारी (दि.१) येथील बाई गंगाबाई रूग्णालयाची पाहणी करून डॉक्टरांची चांगलीच कान उघडणी केली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना बालमृत्यू प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले. रूग्णालयात ३४ बाळांच्या मृत्यूचे प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. असे असतानाही शासन अजून जागे झाले नाही व आरोग्य मंत्री तसेच आरोग्य संचालकांनी रूग्णालयाला अद्याप भेट दिली नसल्याचे समजताच खासदार पटेल यांनी धरणे आंदोलनानंतर रूग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी डॉक्टरांची चांगलीच कान उघडणी करीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना रूग्णालयातील बालमृत्यू प्रकरणाच्या चौकशी व दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. एवढेच नव्हे तर खासदार पटेल यांनी यावेळी रूग्णालयात जावून रूग्णांशी थेट संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच रूग्णांना शासनस्तरावर मिळणाऱ्या सर्व सोयी देण्यात याव्या असे निर्देश दिले. याप्रसंगी त्यांच्या सोबत माजी आमदार राजेंद्र जैन, नरेश माहेश्वरी, अशोक गुप्ता, सतीश देशमुख, नानू मुदलीयार, विनीत सहारे, विजय रगडे, करण गिल, टप्पू गुप्ता, तिर्थराज हरिणखेडे, विनायक शर्मा व अन्य पदाधिकारी होते.