लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भभर २ आॅक्टोबरला सामूहिक उपोषण व आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. विदर्भातील ११ जिल्ह्याच्या व १२० तालुक्याच्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार आहे.विदर्भ वेगळा झाल्यास सिंचनाचा बॅकलॉग पूर्ण करुन विद्युत बिल हेअर्धे होईल. रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्यामुळे सरकारने २०१९ च्या निवडणुकीपूर्वी वेगळ्या विदर्भाची घोषणा करावी,अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी केली. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकारी व सदस्यांची बैठक तिरोडा येथे पार पडली. या वेळी ते बोलत होते. या वेळी पश्चिम विदर्भ महिला आघाडी अध्यक्षा रंजना बांबर्डे, पत्रकार संघाचे अध्यक्ष डी.आर. गिरीपुंजे, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा अॅड. माधुरी रहांगडाले, तालुका संयोजक जगन्नाथ पारधी, बी.यू.बिसेन, कमल कापसे, राजेश तायवाडे, शहर प्रमुख बाबुराव डोमळे, तालुका महिला आघाडी अध्यक्ष उत्तरा भोंगाडे, रामकृष्ण आगाशे, रमेश वंजारी, भोजराम तुरकर, इंदू भोंगाडे, सुमित्रा वालदे, सुनिता पुराडे, यशवंत बावनकर, सुनील बारापात्रे, सुरेश धुर्वे, सरपंच जगदेव आमकर उपस्थित होते. नवले म्हणाले, नागपूर शहर पूर्वी राजधानीचे शहर होते. त्याचे मात्र डिमोशन करुन मुंबई व भोपाळला राजधानी बनवून नागपूरला उपराजधानी करण्यात आले. विदर्भाचा रस्त्याचा अनुशेष शिल्लक आहे. सिंचनाचा एक लाख कोटीचा निधी पश्चिम महाराष्ट्राने पळविला. १० जिल्ह्याचे ३० जिल्हे व १०० तालुक्याचे ३०० तालुके होवून नोकऱ्यांची निर्मिती झाली.त्याचप्रमाणे विदर्भाच्या ११ जिल्ह्याचे ३० जिल्हे १२० तालुक्याचे ३०० तालुके निर्माण होवून नोकºया निर्माण होतील असे सांगितले. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष गिरीपुंजे यांनी नोकºयांचा बॅकलॉग पूर्ण करण्यासाठी विदर्भ वेगळा झाला पाहिजे असे मत व्यक्त केले. अॅड. रहांगडाले यांनी आपल्या प्रास्ताविकातून विदर्भ वेगळा झाल्यास कसा स्वयंपूर्ण होऊन वीज आपल्याजवळ अतिरिक्त असल्याने विकता येईल हे सांगितले.
विदर्भ वेगळा झाल्यास रोजगाराच्या संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 23:48 IST
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भभर २ आॅक्टोबरला सामूहिक उपोषण व आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. विदर्भातील ११ जिल्ह्याच्या व १२० तालुक्याच्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
विदर्भ वेगळा झाल्यास रोजगाराच्या संधी
ठळक मुद्देराम नेवले : आगामी निवडणुकांपूर्वी विदर्भ वेगळा करा, २ आॅक्टोबरला आंदोलन