शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

स्पर्धेतून अपंगांच्या गुणांना संधी

By admin | Updated: February 1, 2016 01:46 IST

अपंग बांधव हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. कोणत्याही कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा वाखाणण्याजोगी आहे.

राजकुमार बडोले : अपंगांच्या राज्यस्तरीय अजिंक्यपद मैदानी क्रीडा स्पर्धागोंदिया : अपंग बांधव हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. कोणत्याही कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा वाखाणण्याजोगी आहे. अपंगांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मैदानी स्पर्धांमधून त्यांच्यात असलेल्या सुप्त क्रीडा गुणांना संधी मिळते, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. जिल्हा क्रीडा संकुल येथे ३० व ३१ जानेवारी रोजी दोन दिवसीय बाराव्या वरिष्ठ आणि सहाव्या कनिष्ठ राज्यस्तरीय अपंगाच्या अजिंक्यपद मैदानी क्रीडा स्पर्धा सन २०१५-१६ चे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, रेणुका बिडकर, पॅरा अ‍ॅथलेटिक्सचे राज्याध्यक्ष विनोद नरवडे, प्रविण उघडे, डॉ. दयानंद कांबळे, अपूर्व अग्रवाल उपस्थित होते. पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, जिल्हास्तरावर पॅराआॅलिंपिक स्पर्धा घेण्यासाठी एक लाख रुपये देण्याचा प्रस्ताव आहे. अनेक क्रीडा संस्था अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा घेण्यासाठी पुढे येतात. मनात कोणतीही गोष्ट करण्याची इच्छा असली तर कोणीही थांबवू शकत नाही. प्रत्येकाने सामाजिक दायित्व पार पाडले पाहिजे, असेही ते म्हणाले. सामाजिक न्याय विभागाने मागील वर्षी महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, अपंगांना तीन टक्के आरक्षण, त्यांच्यासाठी निधीची तरतूद, घरकूल योजनेचा लाभ आणि एक हजार रुपये मानधन देण्याचे निश्चित केले. पाच टक्के आरक्षण अपंग खेळाडूंना देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून अंधश्रध्दा निर्मूलनासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबध्द असल्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली. ३० व ३१ जानेवारीदरम्यान चालणाऱ्या या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेत राज्यातील ३२० अपंग खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये २२८ मुले व ९२ मुलींनी सहभाग घेतला. कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक खेळाडू सहभागी झाले असून २७ खेळाडू गोंदियाचे आहेत. कनिष्ठ गटामध्ये १८ वर्षांखालील व वरिष्ठ गटामध्ये १८ वर्षांवरील खेळाडूंचे दोन गट तयार करण्यात आले. यामध्ये १०० मीटर व २०० मीटर धावणे, भाला फेक, गोळा फेक, थाळी फेक आणि लांब उडी या खेळांचा मैदानी स्पर्धेत समावेश आहे.स्पर्धेसाठी जिल्हा सचिव अनिल शहारे, शोभेलाल भोंगाडे, दिनेश पटेल, दिगंबर बंसोड, अभय अग्रवाल, मुजीर शेख, निलेश फुलबांधे यांच्यासह क्रीडा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सहकार्य केले. संचालन करून आभार जनार्धन कुसराम यांनी मानले. (प्रतिनिधी)