शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

संचालकाने केली फसवणूक?

By admin | Updated: January 26, 2017 01:45 IST

भोषा येथील गीता शिक्षण संस्थे द्वारे संचालित तुकाराम हायस्कूल येथील संस्थाध्यक्ष, सचिव व

हरिचंद खोटेले यांचा आरोप : शिक्षिकेच्या प्रकरणाचे काय झाले? कालीमाटी : भोषा येथील गीता शिक्षण संस्थे द्वारे संचालित तुकाराम हायस्कूल येथील संस्थाध्यक्ष, सचिव व मुख्याध्यापक यांनी शासनाची फसवणूक करून शासकीय निधीची अफरातफर केल्याचा आरोप शिक्षक हरिचंद सखाराम खोटेले यांनी केला आहे. काही महिन्यापूर्वी याच शाळेत अश्लील चाळ्याचा प्रकार घडला होता. गिता शिक्षण संस्थेचे सेवकराम मोहपत ब्राम्हणकर यांनी स्वत:च्या मालकीची भोसा येथील गट क्रं.५५८/ब ४.६० हेआर शेतीची जमीन गिता शिक्षण संस्था ता. आमगाव र.नं.एफ ४६९९/मं.तर्फे, सचिव सेवकराम गोकुल टेंभरे रा. कालीमाटी यांना ३० वर्षाकरीता १ जानेवारी २००६ पासून ते ३० डिसेंबर २०३५ पर्यंत लीजवर (भाडाने) दिली. सदर भाडेपत्र दुय्यम निबंधक, आमगाव येथे सादर करण्यात आले. गैरअर्जदार यांनी सचिव टेंभरे यांनी ३० वर्षाकरीता भाड्याने दिलेल्या वरील गट क्रमांकाच्या जमिनीचा भाडेपट्टा १५ मे २००८ रोजी वैद्यपणे रद्द केले. त्यामुळे सदर जागेवर गिता शिक्षण संस्था भोषा किंवा तुकाराम हायस्कूल भोषा यांच्या ताबा वरील दिनांकापासून आपोआपच संपुष्टात आला. सदर जागा संस्थेच्या ९१ शाळेच्या कायदेशीरपणे ताब्यात नसून सुध्दा संगनमताने रद्द केलेला भाडेपट्टा दाखवून महाराष्ट्र शासनाच्या क्रीडांगण विकास योजनेंंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा व गोंदिया यांच्या संगनमत करून एकूण ३ लाख ७५ हजार रुपये अनुदानाची रक्कम स्वत:च्या उपयोगात आणली. अनुदानाच्या रकमेची सन २००८-०९ रूपये, १ लाख ४७ हजार रुपये, सन २००९-१० रु. ५२ हजार ५०० रुपये, सन २०१०-११ रु. १ लक्ष ७५ हजार रुपये असे एकूण ३ लक्ष ७५ हजार रुपयाची उचल करण्यात आली, असे पत्रपरिषदने लेखी पुराव्यासह खोटेले यांनी दिली. याच जागेचे भाडेपत्र दोन वर्षामध्येच १५ मे २००८ रोजी रद्द करून त्यानंतर सन २००८-२०११ या कालावधीत वरील प्रमाणे अनुदान राशीचे गैरअर्जदार अध्यक्ष सेवकराम ब्राम्हणकर, सचिव सेवकराम टेंभरे, मुख्याध्यापक अशोक बिसेन यांनी शासनाची दिशाभूल करून शासकीय निधी हडप केलाच्या आरोप आहे. सदर जागेवर इमारतीचे बांधकाम केले आहे. काही भागात भाजीपाला व तुरीच्या पिकाची लागवड केली असून काही भागात वाळुचा साठा केला आहे. खासदार निधीतून सुरक्षा भिंतीचे काम केले आहे. सदर जागेचे भाडेपत्र रद्द केल्यानंतर व क्रीडांगण विकास योजनेची अनुदान राशी लाटल्यानंतर याच जागेवर महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या योजनेतून, केळीबाग लागवड, भाजीपाला पिकासाठी शेडनेट हाऊस उभारणी व ठिंबक सिंचन या योजनांचे लाखो रुपयाचे अनुदान संस्था चालक हडप करीत आहे. गीता शिक्षण संस्थेद्वारे तुकाराम हायस्कूल येथे बीएड प्रवेशाकरीता बोगस अनुभव प्रमाणपत्र दिले गेले. कर्मचाऱ्यांना प्रवास रजा सवलत (एलटीसी) घेतल्याचे ही प्रकार उघडीस येत आहे. बीडी शिष्यवृत्ती, पोषण आहार यात गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनात आणून दिले. सदर प्रकरणी चौकशी करण्यात यावी व दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी हरिचंद सखाराम खोटेले यांनी आमगाव पोलिसात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. (वार्ताहर) संस्थेवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. आम्ही शासकीय निधीचा वापर नियमाप्रमाणे केला आहे. खाजगी जागा व संस्थेला दिलेली जागा वेगवेगळी असून ती माझ्या मालकीची आहे. शासन निधी देतांना अधिकारी वर्ग तपासूनच निधी व कार्य मंजूर करीत असते. सदर आरोप खोटे आहेत. - सेवकराम ब्राम्हणकर अध्यक्ष गीता शिक्षण संस्था, भोसा