शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

सागाची खुलेआम तस्करी उघडकीस

By admin | Updated: January 20, 2015 00:07 IST

गुप्त सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून अवैधरीत्या सागाची लाकडे वाहतूक करणाऱ्या मिनी मेटॅडोअरला (एमएच ३५/के-२२७१) पकडले.

गोंदिया : गुप्त सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून अवैधरीत्या सागाची लाकडे वाहतूक करणाऱ्या मिनी मेटॅडोअरला (एमएच ३५/के-२२७१) पकडले. सदर वाहनासह सागाच्या लाकडांची किंमत सुमारे दोन लाख रूपये आहे. ही कारवाई रविवारी (दि.१८) रात्री ८ वाजता गोंदियाच्या निर्मल टॉकिजजवळ करण्यात आली.मिनी मेटॅडोअर चालक व मालक राजेश बाबुलाल सोनुले (४२) रा. फुलचूर असे आरोपीचे नाव आहे. राजेश आपल्या वाहनात सागाची लाकडे भरून गोरेगाव मार्गावरून गोंदियाकडे येत असल्याची माहिती राऊंड आॅफिसर ए.एन. साबळे यांना मोबाईलवर मिळाली. त्यांनी त्वरित एसीएफ ठक्कर यांना फोन करून वाहन मागितले. वाहन मिळताच ते निर्मल टॉकिजजवळ पोहचले व मदतीसाठी वनरक्षक फुंडे यांना बालावून घेतले. तेवढ्यातच सागाच्या लाकडांनी भरलेले वाहन आले. त्यांनी वाहन थांबवून चौकशी केली असता चालक राजेश सोनुले याने अंजनाची लाकडे असल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्ष तपास केल्यावर ती सागाची लाकडे असल्याचे समजले. लाकडांची साल काढलेली होती. तेवढ्यातच राजेशसह असलेल्या दुसऱ्या इसमाने तिथून पळ काढला. जप्त करण्यात आलेली लाकडे ०.८०० घनमीटर असून त्यांची किमत २२ हजार रूपये व वाहनाची किमत मिळून दोन लाख रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. ही लाकडे मोठ्या गोल आकाराचे असून एकूण १० नग आहेत. सदर सागाची लाकडे नागझिरा अभयारण्याशी लागून असलेल्या मंगेझरी, आसलपाणी परिसरातील असण्याची शक्यता वनपरिक्षेत्राधिकारी (आरएफओ) आनंद मेश्राम यांनी व्यक्त केली. अवैध वाहतुकीच्या कलम २७, ४१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई एसीएफ ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी आनंद मेश्राम, राऊंड अधिकारी ए.एन. साबळे व वनरक्षक फुंडे यांनी केली. (प्रतिनिधी)