शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Gondia; गोंदिया जिल्ह्यातील शंभर नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 20:19 IST

जिल्हा आरोग्य विभागाने कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत पाठविलेल्या एकूण १०५ नमुन्यांपैकी गुरूवारपर्यंत १०० स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे.

ठळक मुद्देपुन्हा पंधरा जणांचे नमुने पाठविलेजिल्हावासीयांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा आरोग्य विभागाने कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत पाठविलेल्या एकूण १०५ नमुन्यांपैकी गुरूवारपर्यंत १०० स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे.तर गुरूवारी पुन्हा १५ स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले आहे. जिल्ह्यातील आतापर्यत शंभर स्वॅब नमुने निगेटिव्ह आल्याने जिल्हावासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे.कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने घेऊन ते नागपूर मेयो येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. मात्र मागील पाच सहा दिवस प्रयोगशाळेकडून नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला नसल्याने जिल्हावासीयांची आणि आरोग्य विभागाची सुध्दा चिंता वाढली होती. त्यानंतर बुधवारी जिल्ह्यातील ६४ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. तर गुरूवारी ४४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण १०० स्वॅब नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर आधी पाठविलेले ५ आणि गुरूवारी (दि.९) पाठविलेले १५ अशा एकूण २० स्वॅब नमुन्यांचा अहवाल आता प्राप्त होणे बाकी आहे. तर एक नमुना आधीच पाझिटिव्ह आला आहे.दरम्यान आत्तापर्यंत पाठविलेले शंभर नमुने निगेटिव्ह आल्याने जिल्हावासीयांना सुध्दा मोठा दिलासा मिळाला आहे.

८६ जण शासकीय अलगीकरण केंद्रातदिल्ली निजामुद्दीन येथील एका धार्मिक कार्यक्रमा दरम्यान दिल्ली प्रवासाचा संदर्भ असलेल्या जिल्ह्यातील प्रवाशांचा शोध घेऊन त्यांना शासकीय अलगीकरण कक्षात ठेवून त्यांचे स्वॅब नमुने घेऊन ते कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना शासकीय अलीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील यात दोन शासकीय अलगीकरण कक्षात आत्तापर्यंत ८६ जणांना ठेवण्यात आले आहे. यामध्ये गोंदिया आयुर्वेदिक कॉलेज ७६ आणि लहीटोला १० अशा एकूण ८६ व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ.संगिता पाटील यांनी सांगितले.अलगीकरणाचा कालावधी संपलेल्यांवर नजरजिल्ह्यात २५१ व्यक्ती विदेशातून प्रवास करून जिल्ह्यात आल्यात.त्यांचा व त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वच व्यक्तींचा १४ दिवसांचा वास्तव्याच्या ठिकाणी अलगिकरणात राहण्याचा कालावधी संपलेला आहे. अलगीकरणाचा कालावधी जरी संपला असला तरी त्यांनी स्वत:हून अलगिकरणातच राहावे.आपल्या कुटूंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी.तसेच त्यांच्यावर आरोग्य विभागाची सुध्दा नजर आहे

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस