लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असताना रुग्णसंख्येत पुन्हा हळूहळू वाढ होत असल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आठवर पोहोचली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना अधिक सर्तक राहून काळजी घेण्याची व कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गुरुवारी (दि. ९) १७० नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यात ९४ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ७६ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यात एक नमुना कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.५ टक्के होता. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४४९१६८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २२९३७६ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २१९७९२ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यात ४१२११ नमुने कोरोना बाधित आढळले तर आतापर्यंत ४०४९७ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग हळूहळू वाढत आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
८४६७३४ नागरिकांचे लसीकरण कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे. यातंर्गत जिल्ह्यातील १२५ केंद्रांवरून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८४६७३४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळासणासुदीचे दिवस असल्याने पुन्हा बाजारपेठेत गर्दी वाढू लागलीे आहे तर नागरिकांचे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष म्हणजे पुन्हा कोरोनाला निमंत्रण देणारे ठरू शकते. त्यामुळे सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. - सतीश बन्सोड, सामाजिक कार्यकर्ते.