शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता बांधकामासाठी दीडशे वर्ष जुनी झाडे कापली, मग अतिक्रमणही काढणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 05:00 IST

आमगाव तालुक्यात शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारा मुख्य रस्ता रुंदीकरण,  काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. पण रुंदीकरण करीत असताना या  मार्गांवरील शे-दीडशे वर्ष जुनी काही झाड अडथळा निर्माण करतात म्हणून कापण्यात आली. रस्ता रुंदीकरण करताना व  रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला नालीचे बांधकाम करताना अनेक अतिक्रमण काढण्यात आले. 

ठळक मुद्देनगर परिषदेची डोळेझाक : वाहतुकीची कोंडी कायम, शहरवासीय झाले त्रस्त

नरेंद्र कावळेलोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : आमगाव शहरात रेल्वे स्टेशन ते लांजी रोड वाघ नदी पुलापर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. याकरिता तीन-चार पिढ्यांचे साक्षीदार असलेले शे-दीडशे वर्ष जुनी झाड रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरत असल्याने कापण्यात आले. कापलेल्या झाडांचे बुंधे पाहून वृक्षप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या झाड तर कापली मग रस्त्यावर अडथळा ठरणारे अतिक्रमण काढणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.एकीकडे शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेत दरवर्षी लाखो नव्या वृक्षांंची लागवड करण्याची मोहीम शासनाने हाती घेतली असताना दुसरीकडे विकासाच्या नावाखाली जुन्या वृक्षांची कत्तल करून या मोहिमेला गालबोट लावले जात आहे. आमगाव तालुक्यात शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारा मुख्य रस्ता रुंदीकरण,  काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. पण रुंदीकरण करीत असताना या  मार्गांवरील शे-दीडशे वर्ष जुनी काही झाड अडथळा निर्माण करतात म्हणून कापण्यात आली. रस्ता रुंदीकरण करताना व  रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला नालीचे बांधकाम करताना अनेक अतिक्रमण काढण्यात आले. नालीचे बांधकाम पूर्ण होताच  अनेक लघु व्यावसायिकांनी नालीवर पक्के बांधकाम करून टाकले तर लहान मोठ्या व्यावसायिकांनी नालीच्या बाहेरही अतिक्रमण करून टाकले. मात्र नगर परिषद प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभागाने अजूनपर्यंत कुठलीच कारवाई केली नाही. 

नियमांचे पालन करण्याचा पडला विसरnविकास कामाकरिता जुनी झाड कापलीत तर मग विकास कामात अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणधारकांवर पण कारवाही झालीच पाहिजे. आधीच रस्त्यावर अतिक्रमणामुळे नागरिकांना आपली वाहने रस्त्यावर उभी करावी लागते. त्यामुळेच वाहतुकीचा खोळंबा होतो. रस्त्याचे काम करताना तोडण्यात आलेल्या झाडांच्या बदल्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावण्याचा नियम आहे. वृक्ष लागवडीनंतर सुमारे दहा वर्ष त्या झाडांचे संगोपन व देखरेख करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असते. पण याचा सुध्दा विसर पडत आहे. 

नालीवरील अतिक्रमण काढण्यात यावे, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. - डी. एस. भोयर, तहसीलदार व प्रशासक नगर परिषद आमगाव

आम्ही नालीचे बांधकाम करताना अतिक्रमण काढले होते. नालीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा अतिक्रमण होऊ न देणे ही जबाबदारी नगर परिषदेची आहे. - सुनील बडगे, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग 

टॅग्स :highwayमहामार्गEnchroachmentअतिक्रमण