नरेश रहिले गोंदियाविद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात युती शासनाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयाची अमंलबजावणी गोंदिया जिल्ह्यात झाली. त्याचे पुढचे पाऊल म्हणून वर्ग १ ते ४ थीच्या विद्यार्थ्यांसाठी दप्तर विरहित दिन महिन्याचा चौथ्या शनिवारी शाळेत साजरा केला जाणार आहे. या दिवशी अभ्यासक्रम न शिकविता शाळास्तरावरील विविध उपक्रम घेतले जाणार आहेत.बालकांना दप्तराच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी शिक्षण विभागाने शाळांमध्ये पुस्तके, खेळाचे साहित्य, पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध केल्याने पाठीवरच्या भल्या मोठ्या दप्तराच्या ओझ्यातून बच्चे कंपनी आता मुक्त होत आहेत. पाठीवर मोठे दप्तर, खांद्याला पाण्याची बॉटली, दुसऱ्या खांद्याला बॅट किंवा बॅडमिंटन रॅकेट अश्या अवस्थेत विद्यार्थी आपल्याला सर्रास दिसतात. त्या दृष्टीने शिक्षण विभागाला निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्याचे दप्तर हे दररोज पाठीवरून घेऊन जाण्याच्या दैनंदिन उपक्रमामुळे विद्यार्थीही त्रस्त झाले होते. दप्तरात पाठ्यपुस्तके, वह्या, मोठ्या वह्या, अनावश्यक लेखन साहित्य, चित्रकला साहित्य, शब्दकोष, रायटींग पॅड, गाईड्स, शिकवणीचे दप्तर, स्वाध्याय पुस्तीका, पाण्याची बॉटली, खाऊचा डबा, स्वेटर, खेळाचे साहित्य असे अनेक साहित्य त्या दप्तरात राहात असल्याने दप्तराच्या ओझ्याने विद्यार्थी दबत होते. यामुळे विद्यार्थ्यांची शारिरिक वाढ होणे अपेक्षीत होते. विद्यार्थ्याला तणावमुक्त व आनंददायी शिक्षण देण्यासाठी इयत्ता पहिली ते ४ थी पर्यंत च्या विद्यार्थ्यांचे ओझे कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेने दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी दप्तर विहरहीत दिन राबविण्याचे ठरविले आहे. हा उपक्रम २७ आॅगस्ट २०१६ पासून जिल्ह्यात राचविला जाणार आहे विद्यार्थ्यांच्या वजनाच्या १० टक्केपेक्षा जास्त दप्तराचे वजन असू नये असे आदेश शासनाचे असून त्या दिशेने पाऊल उचलले आहे. वर्ग १ ते ४ थी च्या ५१ हजार ७२ बालकांना दप्तरविरहीत दिनी विद्यार्थ्यांना मैदानी खेळ व त्यांच्या बौध्दीक स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्व शाळांमधील वर्ग १ ते ४ च्या विद्यार्थ्यासाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे. यात आमगाव तालुक्यात ५४२७, अर्जुनी-मोरगाव ६६१२, देवरी ४४६२, गोंदिया १२३८९, गोरेगाव ५३१४, सडक-अर्जुनी ५२५८, सालेकसा ४२८१ व तिरोडा ७३२९ असे एकूण ५१ हजार ७२ विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे. असे घेणार उपक्रमदप्तर विरहीत दिनी विद्यार्थी शाळेत रममान होतील यासाठी बौध्दीक, शारिरिक व कार्यानुभव या विषयाशी निगडीत बोधकथा, कविता, निबंध, गीतगायन, वाचन, चित्रकला, कबड्डी, खो-खो, धावण्याची स्पर्धा, लांब उडी. उंच उडी, रस्सी कुद, लगोरी, रिंग, फुटबॉल, बुध्दीबळ, कॅरम, सापसिडी, व बुध्दीमत्तेवर आधारीत खेळ खेळले जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी दृकश्राव्य साधनांच्या माध्यमातून निसर्गातील सजिव प्राण्यांची माहितीपट, झाडे, नद्या, पर्वतरांगा, सृष्टीचक्र, निसर्गचक्र, सुर्यमाला, ग्रह, सन-उत्सव, थोर पुरूषांच्या जीवनावर आधारीत माहितीपट, कार्टून चित्रपटाच्या माध्यामातून धार्मिक माहितीपट व विविध खेळावर आधारीत माहिती दाखविण्यात येणार आहे.जड दप्तरामुळे जडतात हे आजारजड दप्तरामुळे मुलांना पाठदुखीचा त्रास होणे, सांधे आखडणे, मान दुखने, स्रायू आखडने, मणक्याची झीज होणे, थकवा, मानसिक तणाव श्या व्याधींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत होते. या सर्व बाबाीचा विचार करून भाजप व शिवसेनेच्या युती सरकाने दप्तराचे ओझे कमी करण्याचा गांभीर्याने निर्णय घेतला. पालकांनो अशी काळजी घ्याप्रत्येक पालकाने आपल्या मुलाच्या दप्तराचे वजन मुलाच्या वजनाच्या १० टक्केपेक्षा कमी आहे याची काळजी घेणे, वह्यांची जाडी कमी करावी, मुलांच्या शाळेशी निगडीत सर्व साहित्य घरात एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी कपाट, रॅक, पेटीची व्यवस्था करावी, बॅग कमी वजनाची विकत घ्यावी.
महिन्यातून एकदा दप्तर विरहित दिन
By admin | Updated: August 27, 2016 00:04 IST