बाबुलाल कठाणे (६०) गुरुवारी नेहमीप्रमाणे शेतात आपली जनावरे चारायला घेऊन गेले होते. नाल्यावर असलेल्या वीज खांबावरील जिवंत वीजवाहिनी तुटून नाल्यात पडल्याने पाण्यात वीज प्रवाह आला होता. जनावराची पाहणी करताना बाबुलाल कठाणे नाल्याजवळ गेले असता त्यांना करंट लागल्याने ते नाल्यातील पाण्यात पडले व त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, विजेच्या प्रवाहामुळे पाण्यातील साप व मासेही मरण पावले आहेत. सायंकाळ होऊनही बाबुलाल कठाणे घरी न परतल्यामुळे घरच्यांनी शोधाशोध केली मात्र त्यांचा पत्ता लागला नाही. यावर शुक्रवारी (दि.१५) सकाळीच घरच्यांनी त्यांची शोधाशोध केली असता त्यांचा मृतदेह मिळून आला. वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे त्यांचा मृत्यू झाला असून, कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यात यावी; तसेच वीज वितरण कंपनीने हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
करंट लागून वृद्धाचा मृत्यू ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:33 IST