शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

तेलही गेले अन् तूपही गेले...

By admin | Updated: March 9, 2016 02:55 IST

आमगावला नगर परिषदेचा दर्जा मिळावा याकरिता अनेकांनी सुखद स्वप्न पाहिली. या स्वप्नात अनेकांचे अनेक प्रकारे हित गुंतले आहे,

ओ.बी. डोंगरवार आमगावला नगर परिषदेचा दर्जा मिळावा याकरिता अनेकांनी सुखद स्वप्न पाहिली. या स्वप्नात अनेकांचे अनेक प्रकारे हित गुंतले आहे, पण त्या स्वप्नाची पूर्तता कशी होणार हा मोठा तिढा आहे. शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे तालुक्याच्या ठिकाणी नगर पंचायत करण्यात आली. पण आमगावला नगर पंचायत न देता नगर परिषद मिळावी यासाठी काही लोकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने हा शासनाच्या अखत्यारितील प्रश्न असल्याचे सांगून चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात टाकला. आता या लढाईत तेलही गेले अन् तुपही गेले व हाती धुपाटने आले, अशी स्थिती सध्यातरी आहे.आमगावला नगर परिषदेचा दर्जा मिळावा याकरिता अनेक राजकीय पक्षांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. काहींनी छूपा पाठिंबा दिला. लोकसंख्येचा विचार करुन आमगावला नगर परिषद मिळणे रास्त आहे. आमगाव, बनगाव, रिसामा, कुंभारटोली, माल्ही, पदमपूर, किंडगीपार या ग्रामपंचायतची लोकसंख्या ग्राह्य धरुन जर गणित मांडले तर नगर परिषद होण्याकरिता वेळ लागणार नाही. मात्र नगर परिषद नको होती असे ज्यांनी बोलून दाखवले नाही तरी काहींच्या पोटात दुखणे सुरू झाले होते. याला कारणही होते. राजकारणाच्या सारीपाटात सर्वकाही चालते. मतभेद असले तरी मनभेद नकोत, तेच येथे घडले. काहींना वाटले जर नगर परिषद झाली तर आज आपली दुकानदारी बंद झाल्याशिवाय राहणार नाही. काहींची मलाई खाणे बंद झाले असते. दुसरे म्हणजे पंचायत व जिल्हा परिषदेवर निवडून आलेल्या विजयी उमेदवारांनी जे काही पैसे खर्च केले ते गंगेत वाहल्या गेले असते. म्हणजे तेथेही तेल व तूपही गेले अशी स्थिती निर्माण झाली असती. काही ग्रामपंचायतींनी नगर परिषदेत समाविष्ठ होण्यासाठी हरकत ठराव दिला होता. तेच विरोधात उतरले. जनमत तयार करुन आपली ग्रामपंचायत बरी असा विचार त्यांनी केला. ज्या ग्रामपंचायतींना नगर परिषदेमध्ये समाविष्ट होणार अशी चाहूल लागली त्यांनी राजकारणाच्या सारीपाटात खेळी खेळणे सुरू केले. नगर परिषद झाली तर आपल्या हाती सत्ता येणार असे गृहीत धरुन अनेक जण मैदानात उतरले. एकमेकांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन अनेकांनी नेम लावला. मात्र न्यायालयाच्या निर्णयाने सगळ्यांचा बार फूसका ठरला.नगर परिषद होणे हे अत्यंत गरजेचे आहे. जो निधी लोकसंख्येच्या आधारे मिळतो त्यात अनेक विकासात्मक कामांना आणखी गती मिळाली असती. यात सध्या कार्यरत ग्रामपंचायत कर्मचारी मोठे खुष झाले होते, कारण त्याच्या पोटपाण्याच्या शिदोरीत भर पडणर होती. मात्र तेथेही तेल व तूपही गेले अशी अवस्था निर्माण झाली. नगर परिषद होण्याकरिता केंद्रस्थानी असलेल्या ग्रामपंचायतपासून एक ते दिड कि.मी. अंतरावरील ग्रामपंचायतींचा समावेश करुन नगर परिषद जाहीर करणे गरजेचे होते. काही ग्रामपंचायती हरकत घेतात व नंतर सत्ता बदलली म्हणून कार्यरत पदाधिकारी मतही बदलतात. यासाठी ठराव असो वा नसो, विरोध करणारे विरोध करतील. मात्र विकासात्मक कार्याचा विचार करता शासनाने ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे. न्यायालयाने शासनाला योग्य निर्णय घेण्याकरिता सांगितले आहे. त्यामुळे चेंडू शासन दरबारी आहे. याकरिता स्वप्न पाहणाऱ्यांनी किंवा ज्याचे स्वप्न भंग झाले त्यांनी आमगाव नगर परिषदमय व्हावे याकरिता शासन दरबारी दंड ठोकून मैदानात उतरणे गरजेचे आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रशासकांची बोलती बंद झाली. आता न्यायालयाच्या निर्णयानंतर काय करावे याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याचे प्रशासकांनी सांगितले. त्यांचीही स्थिती दोलायमान झाली आहे.