शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मंडळ अधिकारी व तलाठ्यांचे लेखणी बंद आंदोलन

By admin | Updated: April 7, 2016 01:44 IST

आपल्या विविध मागण्यांना घेऊन तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी विदर्भ पटवारी संघाच्या पुढाकाराने जिल्ह्यात बुधवारपासून लेखणीबंद आंदोलन सुरू केले.

विविध मागण्यांचा समावेश : ३० मंडळ अधिकारी व १९० तलाठ्यांचा सहभागगोंदिया : आपल्या विविध मागण्यांना घेऊन तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी विदर्भ पटवारी संघाच्या पुढाकाराने जिल्ह्यात बुधवारपासून लेखणीबंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला जिल्ह्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला असून आठही तालुक्यातील ३० मंडळ अधिकारी व १९० तलाठी सहभागी झाले होते. १० एप्रिल रोजी या लेखणीबंद संदर्भात चर्चा न झाल्यास सदर आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. गोंदिया येथील तहसीलदार संजय वामन पवार व उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव यांची गैरवर्तन व अन्यायकारक व्यवहारामुळे त्यांचे स्थानांतरण करण्यात यावे अशी मागणीही तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी केली आहे. बनाथर येथील तलाठी पी.बी. निमजे, दासगाव येथील मंडळ अधिकारी यांचे निलंबन मागे घेण्यात यावे असेही निवेदनात म्हटले आहे. सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास ११ एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष एन.एस. लिल्हारे, सचिव बी.डी. भेंडारकर, सहसचिव डी.पी. हत्तीमारे व इतर सदस्यांनी दिली आहे. अर्जुनी मोरगावमहाराष्ट्र राज्य तलाठी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघ आणि विदर्भ पटवारी संघ जिल्हा शाखा गोंदियाने तलाठ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुकारलेल्या बेमुदत लेखणीबंद आंदोलनाच्या समर्थनार्थ आज (दि.६) पासून तालुक्यातील पटवारी व मंडळ अधिकारी व मंडळ अधिकारी सहभागी झाले आहेत. यासंदर्भात तहसीलदार डी.सी. बांबोर्डे यांना निवेदन देण्यात आले. संघाने निवेदनात तलाठी साझाची व महसूल मंडळाची पुनर्रचना, कार्यालय भाडे देणे, सातबारा संगणीकृत करणे, ई-फेरफारमधील अडचणी दूर करणे, तलाठी मंडळ अधिकाऱ्यांना पायाभूत प्रशिक्षण देणे, अवैध गौण खणिज वसुलीच्या कामातून यासंवर्गास वगळणे, तलाठी व मंडळ अधिकारी स्वतंत्र कार्यालय बांधून देणे, महसूल खात्यातील पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करणे, सरळ सेवेची २५ टक्के पदे, खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवणे, अंशदायी निवृत्तवेतन योजना लागू करणे आणि गोंदियातील निलंबित तलाठी निमजे व म.अ. वरखडे यांचे निलंबन मागे घेणे, या मागण्याना घेऊन तालुक्यातील पटवारी संघाने बेमुदत लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. लेखणीबंद संपामुळे पटवारी कार्यालयात संबंधित कामासाठी आलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागला. नागरिकांच्या कार्यालयीन कामाची अडचण लक्षात घेवून संघाच्या मागणीची त्वरित पूर्तता होण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)