शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

बोदलबोडी आरोग्य उपकेंद्राच्या फाईलचा ‘ऑफिस टू ऑफिस’ प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 05:00 IST

आदिवासी नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील क्षेत्रात असलेल्या बोदलबोडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची फाईल धूळखात पडली आहे. ८ डिसेंबर २०१७ रोजी तालुका आरोग्य अधिकारी सालेकसा यांच्याकडून जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी गोंदिया यांनी सहसंचालक आरोग्य विभाग मुंबई यांच्याकडे प्रस्ताव पाठविला. पण चार वर्षांपासून बोदलबोडी उपकेंद्राची फाईल मार्गी लागली नाही. 

लोकमत न्युज नेटवर्कसाखरीटोला : सालेकसा तालुक्यातील बोदलबोडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या फाईलचा प्रवास ऑफिस टू ऑफिस सुरू असून ही फाईल मागील चार वर्षांपासून मंत्रालयाच्या बाहेरच पडली नाही. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांना आरोग्य विषयक सोयीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे ही फाईल मार्गी लावण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते यशवंत शेंडे यांनी केली आहे. आदिवासी नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील क्षेत्रात असलेल्या बोदलबोडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची फाईल धूळखात पडली आहे. ८ डिसेंबर २०१७ रोजी तालुका आरोग्य अधिकारी सालेकसा यांच्याकडून जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी गोंदिया यांनी सहसंचालक आरोग्य विभाग मुंबई यांच्याकडे प्रस्ताव पाठविला. पण चार वर्षांपासून बोदलबोडी उपकेंद्राची फाईल मार्गी लागली नाही. बोदलबोडी येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत शेंडे व ग्रामपंचायत कार्यालय मार्फत हा प्रस्ताव आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई येथे असून तो लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी पत्रव्यवहार करून हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. बोदलबोडी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र झाल्यास पाच ते सहा गावातील नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ घेता येईल. यात जवळपास तीन ते चार हजार लोकसंख्या असलेल्या लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून आरोग्य सेवेचा व इतर जीवनदायी योजनेचा लाभ मिळेल. आरोग्य विभागाने त्वरित प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्याची मागणी केली आहे.

 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले