शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

यंदा घटणार पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:59 IST

खरीप हंगामासाठी शासनाने यंदा बँकाना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र आधीच नाबार्डने सर्वच जिल्ह्यांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट मागील वर्षीच्या तुलनेत कमी केले आहे. तर शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीची प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे.

ठळक मुद्देकर्जमाफी योजनेचा परिणाम : वसुलीत घट, शेतकरी संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरीप हंगामासाठी शासनाने यंदा बँकाना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र आधीच नाबार्डने सर्वच जिल्ह्यांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट मागील वर्षीच्या तुलनेत कमी केले आहे. तर शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीची प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी होण्याची आशा असल्याने त्यांनी अद्यापही कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे नवीन पीक कर्जाची उचल केली नसल्याने यंदा पीक कर्ज वाटप कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे.खरीप हंगामासाठी शेतकरी राष्ट्रीयकृत,ग्रामीण आणि जिल्हा बँकेतून पीक कर्जाची उचल करतात. मात्र यासाठी शेतकऱ्यांनी पूर्वी उचल केलेल्या कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे. पूर्वीच्या कर्जाची परतफेड न केल्यास शेतकऱ्यांना नवीन पीक दिले जात नाही. त्यामुळे यंदा जून महिना अर्धा लोटला असतांना जिल्हा बँक वगळता राष्ट्रीयकृत बँक ९ टक्के आणि ग्रामीण बँकेने केवळ ३३ टक्के कर्ज वाटप केले आहे.त्यामुळे निश्चित ही चिंतेची बाब आहे.मागील वर्षी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा केली. यातंर्गत प्रत्येक जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र ठरले. यासाठी गोंदिया जिल्ह्यातील ९८ हजार शेतकरी पात्र ठरले होते.यापैकी ७७ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला तर २० हजार शेतकरी रेड यादीत आले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याची आशा आहे. परिणामी या शेतकऱ्यांनी अद्यापही जुन्या पीक कर्जाची परतफेड केली नाही. तर नवीन पीक कर्जाची उचल सुध्दा केली नाही. तर बऱ्याच शेतकऱ्यांनी मागील वर्षीच्या पीक कर्जाची परतफेड केली नाही.त्यामुळे जिल्हा, राट्रीयकृत, ग्रामीण बँकेच्या कर्ज वसुलीत घट झाली आहे. हीच स्थिती महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यातील बँकाची आहे. त्यामुळेच नाबार्ड यंदा प्रत्येक जिल्ह्यातील बँकाचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ७० ते ८० कोटी रुपयांनी कमी केले आहे.पालक सचिवांनी अधिकाऱ्यांना फटकारलेजिल्हा बँकांने यंदा खरीप हंगामात ७० कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप आत्तापर्यंत करुन ७० टक्के उद्दिष्ट गाठले आहे. मात्र त्यातुलनेत राष्ट्रीयकृत बँकानी केवळ ९ टक्के आणि ग्रामीण बँकेने ३३ टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे. पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँका माघारल्या असल्याने त्यावर जिल्ह्याचे पालक सचिव मुखर्जी यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच अधिकाºयांना फटकारल्याची माहिती आहे.राष्ट्रीयकृत बँकाकडून टोलवाटोलवीखरीप हंगामात पीक कर्ज वाटप करताना शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी बँकानी घेण्याचे निर्देश शासनाने दिले. तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र यानंतरही राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकाकडून शेतकऱ्यांची टोलवाटोलवी सुरूच आहे. त्यामुळे पीक कर्जाची उचल करण्यासाठी शेतकऱ्यांची बँकामध्ये पायपीट सुरू असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज