शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

ओबीसींचे ‘चक्का जाम’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 22:12 IST

मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या केंद्रीय कोट्यात ओबीसी विद्यार्थ्यांना २७ ऐवजी केवळ दोन टक्के आरक्षण देण्यात आले. त्यामुळे ओबीसी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्याप्त आहे.

ठळक मुद्देजयस्तंभ चौकात रास्ता रोको : मुख्य मार्गावरील वाहतूक तासभर प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या केंद्रीय कोट्यात ओबीसी विद्यार्थ्यांना २७ ऐवजी केवळ दोन टक्के आरक्षण देण्यात आले. त्यामुळे ओबीसी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्याप्त आहे. सोमवारी (दि.२५) शासनाच्या आरक्षणविरोधी धोरणाच्या विरोधात गोंदियाच्या जयस्तंभ चौकात ओबीसी संघर्ष कृती समितीद्वारे धरणे आंदोलन अचानक चक्काजाम आंदोलनात परिवर्तीत झाले. त्यामुळे या मार्गावरील जवळपास तासभरापर्यंत वाहतूक प्रभावित झाली.दरम्यान गोंदिया शहर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करण्यासाठी पोलीस व्हॅन बोलावले. परंतु आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने असल्याने पोलीस व्हॅनमध्ये त्यांना घेवून जाऊ शकले नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी स्वत:हून पोलीस ठाण्यात जावून आपल्याला अटक करवून घेतली.केंद्रीय वैद्यकीय प्रवेश समितीच्या वतीने देशात वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा घेण्यात आली. यानंतर उच्च शिक्षणाच्या प्रवेश परीक्षेत आरक्षणाच्या धोरणाचे पालन न करता ओबीसींना ५ हजार २१८ ऐवजी केवळ ७४ जागा देण्यात आल्या. २७ टक्के आरक्षण न ठेवता केवळ दोन टक्के आरक्षण ठेवून शासनाने न्यायालयाच्या आदेशाचे सुद्धा अवमान केला आहे. या प्रवेश परीक्षेत आरक्षण पूर्ववत करून पुन्हा प्रवेश परीक्षा घेण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून ओबीसी संघर्ष कृती समितीने केली होती.गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा संघटनांनी प्रधानमंत्री व केंद्रीय आरोग्य मंत्री यांच्या नावे निवेदन पाठवून सदर मागणी केली होती. परंतु दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीने २५ जून रोजी गोंदियाच्या जयस्तंभ चौकातील आपल्या कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन केले होते. सोमवारी सकाळपासून सुरू सदर धरणे आंदोलन सायंकाळी ४.३० वाजता अचानक चक्का जाम आंदोलनात परिवर्तीत झाला. त्यामुळे जयस्तंभ चौकात एकच धावपळ उडाली. संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जयस्तंभ चौकाचा मुख्य रस्ता जवळपास अर्धा ते पाऊण तासपर्यंत ठप्प झाली होती. त्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली होती. दूरदूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनाची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून आंदोलनकर्त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीस व्हॅनमध्ये जागा कमी असल्यामुळे व आंदोलनकर्त्यांची संख्या अधिक असल्याने आंदोलनकर्त्यांनी स्वत: पोलीस ठाण्यात पोहचून अटक करवून घेतली.धरणे व चक्काजाम आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, अमर वराडे, दीपक बहेकार, मुकेश शिवहरे, सावन कटरे, अर्जुन नागपुरे, राजीव ठकरेले, सविता बेदरकर, खेमेंद्र कटरे, सावन डोये, मनोज डोये, निलम हलमारे, बी.एम. करमकर, हौसलाल रहांगडाले, कमलबापू बहेकार, कैलाश भेलावे, मनोज मेंढे, मिलिंद गणवीर, विनोद हरिणखेडे, नितेश टेंभरे, पुष्पा खोटेले, विमल कटरे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.