शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींचे जिल्हा अधिवेशन

By admin | Updated: March 12, 2017 00:22 IST

आपल्या ओबींसी समाजाला एकत्रित करून होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याकरीता ओबीसी सेवा संघ

सिरपूरबांध : आपल्या ओबींसी समाजाला एकत्रित करून होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याकरीता ओबीसी सेवा संघ व संघर्ष कृती समितीच्या वतीने संयुक्त जिल्हा अधिवेशनाचे आयोजन देवरी येथे करण्यात आले होते. यामध्ये ओबीसी समाजातील लोक अधिक संख्येत उपस्थित होते. या जिल्हा अधिवेशनाअंतर्गत ओबीसी वर्गातर्फे काही प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ओबीसीची जातीनिहाय जनगणना करून शेतकरी व शेतमजुरांच्या विकासाकरीता अर्थसंकल्पात लोकसंख्येनुसार आर्थिक तरतूद करण्यात यावी, पदोन्नतीतील प्रतिनिधीत्व मिळालेच पाहिजे, लोकसंख्या निहाय प्रतिनिधीत्व देण्यात यावे, तामिलनाडू राज्याप्रमाणे असंवैधानिक क्रिमीलेअर अट रद्द करणे, बिहार राज्याप्रमाणे शैक्षणिक भत्ता लागू करणे, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी तालुका व जिल्हास्तरावर वस्तीगृह व आश्रमशाळा सुरू करणे, ओबीसी स्वतंत्र मतदारसंघ व मंत्रालय निर्माण करण्यात यावे, रेल्वे बजेटप्रमाणे शेतकऱ्यांना स्वतंत्र बजेट देण्यात यावे, मंडल आयोग वनाची अप्पन समितीच्या शिफारशी लागू करणे अशा प्रकारे विविध मागण्या ठेवण्यात आल्या होत्या. या अधिवेशनाप्रसंगी प्रथम सत्रात जातीनिहाय जनगणनेशिवाय ओबीसी मंत्रालय अर्थपूर्ण की अर्थहीन या विषयानुसार उद्घाटक इंजि. संजय मगर यांनी माहिती दिली. चेतन उईके म्हणाले की, जोपर्यंत एसटी,एससी, ओबीसी हे एकत्र येवून लढा देत नाही तो पर्यंत शासनावर दबाव निर्माण होणार नाही. सत्राध्यक्ष म्हणून संस्थापक अध्यक्ष इंजि. प्रदीप ढोबळे यांनी ओबीसी कार्यकर्ता व जनतेला मार्गदर्शन केले. ओबीसीं शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात? या प्रबोधन सत्राचे मार्गदर्शक म्हणून बाळासाहेब गावंडे, प्रमुख अतिथी म्हणून सुमन बिसेन, सविता बेदरकर, अमर वऱ्हाडे, राजेश चांदेवार, सावन कटरे,संजय दरवडे व बबलू कटरे यांनी चर्चा घडवून आणली. (वार्ताहर)