शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २००० पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 10:35 IST

शुक्रवारी (दि.४) जिल्ह्यात १५३ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २०२७ वर पोहचली आहे.

ठळक मुद्दे१५३ नवीन बाधित रुग्णएका बाधिताचा मृत्यूगोंदियात सर्वाधिक रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मे महिन्यापासून सातत्याने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर सप्टेबर महिन्यात रुग्ण संख्येत वेगाने वाढ होत आहे. शुक्रवारी (दि.४) जिल्ह्यात १५३ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २०२७ वर पोहचली आहे. तर मृतकांच्या संख्येत सुध्दा वाढ होत असून गोंदिया येथील रामनगर परिसरातील एका बाधिताचा मृत्यू झाल्याने मृतकांचा आकडा २७ वर पोहचला आहे.

सप्टेबर महिन्याच्या सुरूवातीपासून जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट होत असल्याचे चित्र आहे. गुरूवारी सर्वाधिक १८९ रुग्ण आढळले तर शुक्रवारी १५३ नवीन कोरोना बाधितांची भर पडली. गोंदिया शहरातील एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला. शुक्रवारी आढळलेल्या १५३ रुग्णांमध्ये सर्वाधिक १०२ रुग्ण हे गोंदिया शहरातील आहेत. तिरोडा तालुक्यातील ६, गोरेगाव १०, आमगाव ६, सालेकसा ०, देवरी ७, सडक अर्जुनी ५, अर्जुनी मोरगाव १४ आणि बाहेरील ३ अशा एकूण १३५ कोरोना बाधितांचा समावेश आहे. गोंदिया, आमगाव आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळत असल्याने हे तिन्ही तालुके आता कोरोनाचे हॉटस्पॉट होत आहे.

कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील बरे आहे. शुक्रवारी एकूण ५२ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे आतापर्यंत १०९९ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २०२७ कोरोना बाधित आढळले आहे.सध्या स्थितीत ९०० कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहे. गोंदिया शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने शहरवासीयांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांनी आता स्वत:च पुढाकार घेत कोरोनाचीे साखळीे खंडीत करण्यासाठी आठ दिवस शहरातील बाजारपेठे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरातील व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जात आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असताना त्यातुलनेत मात्र जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा तोकडी पडत असल्याचे चित्र आहे.

कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने केवळ गंभीर असलेल्या कोरोना बाधितांना रुग्णालयात दाखल केले जात आहे. तर गंभीर नसलेल्या रुग्णांना घरीच आयसोलेशन करुन राहण्याचा सल्ला दिला जात आहे. तर शहरातील पाच खासगी रुग्णालयांमध्ये सुध्दा कोरोना बाधितांवर उपचार करण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे रुग्णालयांवर ताण बराच कमी झाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस