शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात कोरोना बाधितांची संख्या पोहोचली ४०,००० पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 18:30 IST

कोरोनावर मात करणाऱ्यांचा आलेख उंचावला : बाधितांच्या संख्येत होतेय घट : दुसरी लाट ओसरलीगोंदिया : मागील वर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता.

कोरोनावर मात करणाऱ्यांचा आलेख उंचावला : बाधितांच्या संख्येत होतेय घट : दुसरी लाट ओसरलीगोंदिया : मागील वर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर जवळपास दीड महिना जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र त्यानंतर पुन्हा संसर्गात वाढ होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला केवळ एक रुग्ण संख्या असलेल्या गोंदिया जिल्ह्यात १४ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ४० हजार रुग्णांची नोंद झाली. मात्र दिलासादायक बाब म्हणजे यापैकी ३७८८६ बाधितांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर आता कोरोनाची दुसरी लाट सुध्दा जिल्ह्यातून बऱ्यापैकी ओसरायला लागली आहे.

शुक्रवारी (दि.२१) जिल्ह्यात ५०० बाधितांनी कोरोनावर मात केली तर १३० नवीन रुग्णांची नोंद झाली. ४ बाधितांचा उपचारा दरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. मागील आठ ते दहा दिवसांपासून कोरोना बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांचा ग्राफ वाढल्याने जिल्ह्यातून कोरोनाची लाट आता पूर्णपणे ओसरला लागल्याचे समाधानकारक चित्र आहे. कोरोना ॲक्टिव रुग्णांची संख्या सुध्दा आता १४७८ आली असून कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी मागील दीड महिना जशी काळजी घेतली तशीच काळजी पुढे सुध्दा घेत राहिल्यास कोरोना जिल्ह्यातून हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १५१३५४ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १२५६७९ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत १७९७३२ जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १५९०३४ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४००२३ कोरोना बाधित आढळले असून तयापैकी ३७८८६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत १४७८ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर १२५९ स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.काेरोना रिकव्हरी दर ९४.६६ टक्केकोरोना बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या मागील आठ ते दहा दिवसात वाढली आहे. त्यामुळे कोरोना रिकव्हरी दरात वाढ झाली असून ९४.६६ टक्क्यांवर पोहचला आहे. तो राज्याच्या रिकव्हरी दरापेक्षा ४ टक्क्यांनी अधिक आहे. मात कोरोना बाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरुच असल्याने मृत्यू दर १.६२ टक्केवर पोहचला असून ही थोडी चिंताजनक बाब आहे.

२२४७ चाचण्या १३० पॉझिटिव्ह

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कोरोना चाचण्यावर भर दिला जात आहे. यातंर्गत शुक्रवारी एकूण २२४७ रॅपिड अँटिजन आणि आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यात १३० रुग्ण पॉझिटिव्ह आले. याचे प्रमाण ४.४७ टक्के आहे.लसीकरण मोहीमेला आली गतीकोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा रामबाण उपाय असल्याने अधिकाधिक प्रमाणात लसीकरण करण्यावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख १९ हजार ९४३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसींचा डोस प्राप्त झाल्याने आता लसीकरण मोहीम सुरळीतपणे सुरु आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस