शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

पक्ष्यांच्या संख्येत १५ हजारांनी वाढ!

By admin | Updated: March 13, 2015 01:53 IST

वन व वन्यजीव विभागाच्या वतीने २१ डिसेंबर २०१४ आणि ११ जानेवारी २०१५ रोजी जिल्ह्यातील आठ तलावांवर आणि नवेगावबांधच्या सहा बोडी तसेच कालव्यांवर पक्षीगणना करण्यात आली.

लोकमत शुभवर्तमानदेवानंद शहारे गोंदियावन व वन्यजीव विभागाच्या वतीने २१ डिसेंबर २०१४ आणि ११ जानेवारी २०१५ रोजी जिल्ह्यातील आठ तलावांवर आणि नवेगावबांधच्या सहा बोडी तसेच कालव्यांवर पक्षीगणना करण्यात आली. यात डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारीमध्ये झालेल्या गणनेत तब्बल १५ हजार १०२ पक्षी जास्त आढळले आहेत. पक्ष्यांची ही वाढती संख्या पक्षीप्रेमींसह वनविभागाला दिलासा देणारी आहे.नवेगावबांधचे पक्षी निरीक्षण केंद्र ते संजय कुटी कालवा, संजय कुटी ते कोहळीटोला, कोहळीटोला ते धाबेपवनी, धाबेपवनी ते धाबेटेकडी आणि जांभळी, जांभळी ते येलोडी, रामपुरी ते रांझी टोक, ते गम्पी बोडी या ठिकाणी पक्षीगणना करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील बदबद्या, खुर्शीपार, चांदोरी (ऊसगाव), रेंगेपार (कोटा), रिसाला, खोद्या, रेंगेपार व खजरी इत्यादी १४ ठिकाणी ११ जानेवारी रोजी पक्षीगणना करण्यात आली. तत्पूर्वी २१ डिसेंबर २०१४ रोजी जिल्ह्यातील एकूण १५ ठिकाणी पक्षी गणना करण्यात आली होती.डिसेंबर २०१४ च्या गणनेत रहिवासी, स्थानिक स्थलांतरीत व स्थलांतरीत असे एकूण १२ हजार ९२७ पक्षी विविध प्रजातींचे आढळले, तर जानेवारी २०१५ मध्ये झालेल्या गणनेत एकूण २८ हजार ०२९ पक्षी आढळले. त्यामुळे जानेवारी महिन्यात तब्बल १५ हजार १०२ पक्ष्यांची वाढ झाल्याचे दिसून येते.जिल्ह्यात प्राणी अभयारण्य व्हावे अशी येथील वन्यप्रेमींची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. त्यामुळे ही आकडेवारी त्यांच्या या मागणीला बळ देणारी ठरणार आहे. त्यादृष्टीने हे शुभवर्तमान ठरत आहे.जानेवारीत आढळलेले विविध तलावांवरील पक्षी पक्षी अभिव्यक्ती केंद्र ते संजय कुटी कालव्यापर्यंत दोन हजार ५६८ पक्षी, संजय कुटी ते कोहळीटोला येथे चार हजार ६६०, कोहळीटोला ते धाबेपवनी नऊ हजार ६१०, धाबेटेकडी-जांबळी एक हजार ७४७, येलोडी चार हजार १३२, रामपुरी-रांझीटोक-गम्पी बोडी तीन हजार ७३३, बदबद्या तलाव २००, खुर्शीपार तलाव ७३०, चांदोरी-ऊसगाव तलाव १३५, रेंगेपार (कोटा) तलाव २०५, रिसाला तलाव ४४, खोद्या तलाव १८, रेंगेपार तलाव ५३, खजरी तलाव येथे १०४ असे एकूण २८ हजार ०२९ विविध वर्गातील विविध प्रजातींचे पक्षी आढळले.डिसेंबर २०१४ मधील पक्षी संख्यापक्षी अभिव्यक्ती केंद्र ते संजय कुटी कालव्यापर्यंत एक हजार ७८२ पक्षी, संजय कुटी ते कोहळीटोला येथे एक हजार ६७१, कोहळीटोला ते धाबेपवनी पाच हजार ७८७, धाबेपवणी ते धाबेटेकडी ७३०, धाबेटेकडी ते जांभळी ४१३, जांभळी ते येलोडी एक हजार एक, रामपुरी ते रांझी टोक २४९, रांझी टोक ते गम्पी बोडी १३२, मोगरा तलाव २१, सौंदड तलाव ४२, गौरीडोह तलाव ५३९, बदबद्या तलाव ६१, राजडोह सरोवर ११४, अजनी हमेशा सरोवर २१७ व खुर्शीपार सरोवर १६८ असे एकूण १२ हजार ९२७ विविध वर्गाच्या विविध प्रजातींचे पक्षी आढळले.