शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

‘एनएसएस’ने शोधली १०५ शाळाबाह्य मुले

By admin | Updated: February 3, 2016 01:54 IST

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी शासनाने अनेक वेळा शोधमोहीम राबविली आहे.

शिक्षणाचा हक्क : आठवीपर्यंत शिकविणारगोंदिया : शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी शासनाने अनेक वेळा शोधमोहीम राबविली आहे. मात्र तरीही समाजात समाजात शाळाबाह्य मुले आढळत आहेत. १ ते ३० जानेवारीदरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) विद्यार्थ्यांमार्फत पुन्हा एकदा शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात आला. त्यात जिल्हाभरात १०५ मुले आढळून आली आहेत.शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी २८ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय सभा घेण्यात आली. ४ जानेवारी रोजी गटशिक्षणाधिकारी यांची सभा झाली. जिल्हा व तालुकास्तरीय माहिती संलग्न करण्यात आली आहे. सर्वेक्षणाचे नियोजन करण्यात आले. एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी सर्वेक्षणात सहकार्य केले. सर्वेक्षण अचूकरित्या व्हावे यासाठी एनएसएसच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सहकार्य केले.जिल्ह्यात कधीच शाळेत न गेलेले २३ मुले व १६ मुली, शाळेत सतत ३० गैरहजर असणारी ५७ मुले व ११ मुली असे ८० मुले आणि २७ मुली मिळून १०५ शाळाबाह्य मुले-मुली असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे गोरेगाव येथील बसस्थानकावर जडीबुटी विकणाऱ्या लोकांची २७ मुले कधीही शाळेत गेली नव्हती. त्या ठिकाणी गटशिक्षणाधिकारी, विषयतज्ज्ञ, विस्तार अधिकारी, गट समन्वयक गेले तरीही त्यांनी शाळेत जाण्यात रस दाखविला नाही. नाईजालास्तव पोलिसांच्या मदतीने त्या मुलांना शाळेत पाठविण्यात शिक्षणाधिकारी उल्हास नरड यशस्वी राहिले.(तालुका प्रतिनिधी)अशी आढळली मुलेगोंदिया तालुक्यात कधीच शाळेत न गेलेले ८ मुले, ३ मुली आढळले. ३० दिवस सतत गैरहजर असलेल्यामध्ये ४६ मुले, ५ मुली असे एकूण ६२ मुले शाळाबाह्य आढळले. अर्जुनी मोरगाव तालुक्यात कधीच शाळेत न गेलेला एक मुलगा आढळला. ३० दिवस सतत गैरहजर असलेल्यामध्ये ५ मुले, एक मुलगी असे एकूण ७ मुले शाळाबाह्य आढळले. गोरेगाव तालुक्यात कधीच शाळेत न गेलेले १४ मुले व १३ मुली आढळले. एकूण २७ मुले शाळाबाह्य आढळले. सालेकसा तालुक्यात ३० दिवस सतत गैरहजर असलेल्यांमध्ये १ मुलगा व १ मुलगी असे एकूण २ मुले शाळाबाह्य आढळले. सडक अर्जुनी तालुक्यात ३० दिवस सतत गैरहजर असलेल्यांमध्ये ४ मुले व ३ मुली असे एकूण ७ मुले शाळाबाह्य आढळले.