शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

न.प.कर्मचारी, कंत्राटदारांना मिळणार थकीत रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 00:13 IST

येथील नगर परिषदेचे रोजंदारी कर्मचाºयांचे वेतन, सेवानिवृत्तीची रक्कम तसेच नगर परिषदेच्या लघु कंत्राटदारांचे लाखो रुपयांचे देयके नगर परिषदेकडे थकीत होते.

ठळक मुद्देआ.अग्रवाल यांचा पाठपुरावा : ३ कोटी ५० लाखांचा निधी वापरण्यास परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील नगर परिषदेचे रोजंदारी कर्मचाºयांचे वेतन, सेवानिवृत्तीची रक्कम तसेच नगर परिषदेच्या लघु कंत्राटदारांचे लाखो रुपयांचे देयके नगर परिषदेकडे थकीत होते. त्यातच दिवाळी सण तोंडावर असल्याने या कर्मचाºयांचे थकीत वेतन आणि कंत्राटदाराचे देयके देण्यात यावे. यासाठी आ.गोपालदास अग्रवाल यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर शासनाने नगर परिषदेकडे व्याजाच्या स्वरुपात जमा असलेल्या रक्कमेतून ३ कोटी ५० लाख रुपये थकीत वेतन आणि देयकासाठी वापरण्यासाठी परवानगी दिली.येथील नगर परिषदेचे नियमित व रोजंदारी कर्मचारी गेल्या काही महिन्यापासून वेतन मिळाले नाही. तसेच कंत्राटदारांची देयक थकीत असल्याने त्यांच्यासमोर संकट निर्माण झाले होते. त्यात दिवाळीचा सण तोंडावर असल्याने वेतन न मिळाल्याने तो साजरा कसा करायचा अशी समस्या त्यांच्यासमोर निर्माण झाली होती. ही समस्या ओळखून काँग्रेस गटनेता शकील मन्सुरी व मुख्याधिकारी चंदन पाटीेल यांनी कर्मचारी आणि कंत्राटदारांचे थकीत रक्कम देण्यासाठी नगर परिषदेकडे व्याजाच्या स्वरुपात जमा असलेल्या निधीतून ३ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम देण्याची परवानगी देण्याची मागणी आ.अग्रवाल यांच्या माध्यमातून शासनाकडे केली. दिवाळीच्या तोंडावर कर्मचाºयांवर ओढवलेले आर्थिक संकट लक्षात घेत अग्रवाल यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन नगर परिषदेचीे अडचण लक्षात आणून दिली. तसेच नगर विकास विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर यांच्याशी चर्चा करुन कर्मचारी आणि कंत्राटदारांची समस्या लक्षात आणून दिली. तसेच नगर परिषदेला ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यास सांगितले. त्याचीच दखल घेत मुख्यमंत्री फडणविस यांच्या निर्देशानंतर नगर विकास विभागाने गोंदिया नगर परिषदेला ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी वापरण्याबाबतच्या परवानगीचे पत्र दिले. त्यामुळे आता नगर परिषद कर्मचाºयांचे थकीत वेतन, सेवानिवृत्त कर्मचाºयांची रक्कम आणि कंत्राटदारांची थकीत देयके देण्याची समस्या मार्गी लागणार आहे. याच निधीतून २१ लाख रुपयांच्या शहरातील पथदिव्यांचे थकीत देयकाचा भरणा केला जाणार आहे.कर्मचाºयांची दिवाळी आनंदातनगर विकास विभागाने नगर परिषदेकडे व्याजाच्या स्वरुपात जमा असलेल्या रक्कमेतून ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी वापरण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे कर्मचाºयांचे थकीत वेतन, फेस्टीव्हल अ‍ॅडव्हाँसची रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे नगर परिषद कर्मचाºयांची दिवाळी आनंदात जाणार आहे.नगरसेवक, अधिकाºयांनी मानले आभारनगर परिषदेला आर्थिक संकटातून मार्ग काढून दिल्याबद्दल आ.गोपालदास अग्रवाल यांचे काँग्रेस गट नेता शकील मन्सुरी, मुख्याधिकारी चंदन पाटील, माजी सभापती राकेश ठाकूर, सुनील तिवारी, सुनील भालेराव, दिपीका रुसे, निर्मला मिश्रा व नगर परिषद कर्मचारी संघटनेचे जहीर अहमद यांनी आभार मानले आहे.