शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

आता दोन रुपयांना मिळणार माचिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 05:00 IST

दिवसेदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे काटेपेटीच्या कच्च्या मालाचीही दरवाढ झाली आहे. परिणामी, ५ प्रमुख काडेपेटी कंपन्यांनी नुकताच दरवाढीचा निर्णय घेतला आहे. काडेपेटी तयार करण्यासाठी १४ प्रकारचा कच्चा माल लागतो. यात १ किलो फॉस्फरसचे दर ४२५ रुपयांनी वाढून ८१० रुपयांवर पोहोचले आहे. वॅक्सची किंमतही ५८ रुपयांवरून ८० रुपये झाली आहे. शिवाय, अन्य साहित्यांचे दर वधारले असून इंधनाच्या किमत वाढली आहे. 

कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सिलिंडरच्या दरवाढीने सर्वच हैराण झालेले असतानाच मागील कित्येक वर्षांपासून एक रुपयाला मिळणारी काटेपेटीही (माचिस) आता महागाईच्या कचाट्यात आली आहे. येत्या डिसेंबर महिन्यापासून ही दरवाढ लागू होणार असून, ही काडेपेटी दोन रुपयांना मिळणार आहे. विशेष म्हणजे, सन २००७ मध्ये म्हणजेच १४ वर्षांपूर्वी काडेपेटीची ५० पैशांनी शेवटची दरवाढ झाली होती  व त्यानंतर काडेपेटी एक रुपयाला विकली जाऊ लागली. मात्र, दिवसेदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे काटेपेटीच्या कच्च्या मालाचीही दरवाढ झाली आहे. परिणामी, ५ प्रमुख काडेपेटी कंपन्यांनी नुकताच दरवाढीचा निर्णय घेतला आहे. काडेपेटी तयार करण्यासाठी १४ प्रकारचा कच्चा माल लागतो. यात १ किलो फॉस्फरसचे दर ४२५ रुपयांनी वाढून ८१० रुपयांवर पोहोचले आहे. वॅक्सची किंमतही ५८ रुपयांवरून ८० रुपये झाली आहे. शिवाय, अन्य साहित्यांचे दर वधारले असून इंधनाच्या किमत वाढली आहे. 

तमिळनाडूत सर्वाधिक उत्पादन - काडेपेटीचे उत्पादन तमिळनाडूत होत असून सुमारे चार लाख लोक या उद्योगातून रोजगार कमावतात. यातील तीन लाख लोक प्रत्यक्ष, तर एक लाख लोक अप्रत्यक्षरीत्या या उद्योगाशी जुळले आहेत. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष रोजगारात ९० टक्के महिलांचा समावेश आहे. - काडेपेटी उद्योगातून महिलांना दिवसा २४०-२८० रुपये, तर पुरुषांना ३००- ते ३५० रुपये मिळतात. देशात काडेपेटीचे सर्वाधिक उत्पादन तमिळनाडूत होत असून उत्पादन क्षेत्र शिवाकाशी, वीरूधुगर, गुडियाधम व तिरूनेलवेली आहे. 

 डिसेंबरपासून किमती वाढणार - काडेपेटी तयार करण्यासाठी १४ प्रकारचा कच्चा माल लागतो. यातील यात १ किलो फॉस्फरसचे दर ४२५ रुपयांनी वाढून ८१० रुपयांवर पोहोचले आहे. वॅक्सची किंमतही ५८ रुपयांवरून ८० रुपये झाली आहे. पेटीसाठी वापरात येणाऱ्या बाहेरील कागदाचे दर २६ रुपयांवरून ५५ रुपये झाले असून आतील कागद ३२ रूपयांवरून ५८ रुपयांनी महागला आहे. शिवाय, इंधन दरवाढीमुळे दळणवळणाचा खर्च वाढल्याने काडेपेटीही भडकली आहे. 

किचनचे बजेट कसे सांभाळायचे ? दिवसेंदिवस महागाई वाढत चालली असून हजार रुपयांच्या घरात आता सिलिंडर आले आहे. भाजीपाला व  किराणा मालाचे दर वधारल्याने स्वयंपाक घरातील बजेट बिघडले आहे. त्यात आता काडेपेटीही सुटली नसून थेट दुप्पट दरावर आली आहे. शासनाने महागाई नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. - स्मिता दखणे (गृृहिणी) 

पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सर्वच वस्तूंवर महागाईचे ग्रहण लागले आहे. भाजीपाला व किराणा मालाचे दर भडकल्याने दररोज काय खावे? असा प्रश्न पडतो. त्यात आता एक रुपयाची काडेपेटी महागाईच्या कचाट्यात आली असून दोन रुपयांची होत आहे. महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यातच आता महागाईचा नागरिकांना फटका बसत आहे.- श्रद्धा शहारे (गृहिणी) 

दिवाळी तोंडावर असून दररोज काहीना काही वस्तूंचे दर वाढताना दिसत आहे. त्यात आता काडेपेटीचे दर थेट दुपटीने वधारणार आहेत. आधिच पेट्रोल, सिलिंडर, भाजीपाला व किराणा मालाचे दर वधारल्याने सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. शासनाने सर्वप्रथम महागाई नियंत्रणात आणली पाहिजे. पण याकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.  - प्रणीता कुळकर्णी (गृहिणी)

 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल