शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आता वर्गातच उघडली जाणार प्रश्न पत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 22:56 IST

बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होत आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आधी केंद्र संचालक आपल्या खोलीत उघडून संबधीत पर्यवेक्षकाला त्यांच्या खोलीतील विद्यार्थी संख्या पाहता त्या प्रश्न पत्रिका वाटप करीत होते.

ठळक मुद्देदररोज बदलणार सहायक परीरक्षक : जिल्ह्यात दोन उपद्रवी केंद्र

नरेश रहिले ।आॅनलाईन लोकमतगोंदिया : बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होत आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आधी केंद्र संचालक आपल्या खोलीत उघडून संबधीत पर्यवेक्षकाला त्यांच्या खोलीतील विद्यार्थी संख्या पाहता त्या प्रश्न पत्रिका वाटप करीत होते. मात्र आता प्रश्नपत्रिका केंद्र संचालकाच्या कक्षात नाही तर थेट परीक्षा केंद्राच्या खोलीतच विद्यार्थ्यांच्या समोर पर्यवेक्षकांकडून उघडण्यात येणार आहे.आधी केंद्र संचालकाच्या कक्षात पेपर सुरू होण्याच्या अर्धा तास किंवा २० मिनीटापूर्वी ह्या प्रश्नपत्रिकांचे बंद पॅकेट फोडून त्यातील प्रश्न पत्रिका वर्गनिहाय विद्यार्थी संख्या पाहता वाटप केले जात होते. त्यामुळे पेपर बाहेर जाण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळे पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासाच संपूर्ण पेपरचे उत्तर कॉपीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविले जात असल्याचे प्रकार पुढे आले. ज्या केंद्रावर ज्यांचा वरधहस्त आहे ते कॉपीचा सुळसुळाट ठेवायचे. काही केंद्र प्रमुख सुध्दा मोठी रक्कम कमवायचे. परंतु आता या सर्व प्रकाराला लगाम लावण्यासाठी विद्यार्थ्यांच्या समोरच हे पेपरचे पॅकेट उघडले जाईल. एका वर्गात २५ परीक्षार्थी बसविण्याची संख्या निश्चित केली आहे. त्यानुसार २५ प्रश्नपत्रिकांचा एक पॅकेट पर्यवेक्षकांच्या हातात सोपविले जाणार आहे. जर एखाद्या वर्गात २५ पेक्षा जास्त विद्यार्थी असतील आणि त्या वर्गात प्रश्नपत्रिका कमी जात असतील तर वेळीच शिल्लक असलेल्या दुसºया वर्गातून त्या प्रश्नपत्रिका मागविल्या जातील. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी सोडविलेले पेपर त्या केंद्रावरील केंद्र संचालक किंवा अतिरिक्त केंद्र संचालक ते पेपर कस्टोडियनपर्यंत सोडत होते. परंतु आता सहाय्यक केंद्र संचालकाच्या जागी सहाय्यक परीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. परीरक्षक सर्व पेपर कस्टोडियनपर्यंत सोडतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक पेपरला परीरक्षक बदलणार आहेत.दहावी व बारावीचे २५ हजार विद्यार्थी देणार परीक्षागोंदिया जिल्ह्यात दहावीची परीक्षा २२ हजार ६४८ तर बारावीचे २२ हजार ४९० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दहावीत गोंदिया तालुक्यातील २६ केंद्रावरून ६६३२ विद्यार्थी, आमगाव तालुक्यातील १० केंद्रावरून २७६१ विद्यार्थी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ९ केंद्रावरून २७६१ विद्यार्थी, देवरी तालुक्यातील १० केंद्रावरून २०४० विद्यार्थी, गोरेगाव तालुक्यातील ९ केंद्रावरून २१५९ विद्यार्थी, सडक-अर्जुनी तालुक्यातील ९ केंद्रावरून २७४७ विद्यार्थी, सालेकसा तालुक्यातील ६ केंद्रावरून १३५९ विद्यार्थी, तिरोडा तालुक्यातील १० केंद्रावरून २१८९ विद्यार्थी, एकूण ८९ केंद्रावरून २२ हजार ६४८ विद्यार्थी परीक्षा देणार ओहत. बारावीत गोंदिया तालुक्यातील २२ केंद्रावरून ६९४० विद्यार्थी, आमगाव तालुक्यातील ७ केंद्रावरून २०९९ विद्यार्थी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ८ केंद्रावरून २५६२ विद्यार्थी, देवरी तालुक्यातील ६ केंद्रावरून १६८८ विद्यार्थी, गोरेगाव तालुक्यातील ७ केंद्रावरून २४६७ विद्यार्थी, सडक-अर्जुनी तालुक्यातील ७ केंद्रावरून १८५५ विद्यार्थी, सालेकसा तालुक्यातील ६ केंद्रावरून १८१० विद्यार्थी, तिरोडा तालुक्यातील १० केंद्रावरून ३०६९ विद्यार्थी, एकूण ७३ केंद्रावरून २२ हजार ४९० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.१४ भरारी पथकदहावी व बारावीच्या होणाऱ्या परीक्षेसाठी जिल्ह्यात १४ भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यात माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे एक पथक, दुसरे पथक प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे, तिसरे पथक डायट प्राचार्यांचे, पाचवे पथक विशेष महिला भरारी पथक, सहावे पथक उपशिक्षणाधिकारी माध्यमिक व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रत्येक तालुक्यात एक असे आठ भरारी पथक असे आठ पथक नेमण्यात आले आहेत. यंदा दोन केंद्र उपद्रवी म्हणून घोषीत करण्यात आले आहेत. त्यात बारावीसाठी जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय परसवाडा तर दहावीसाठी जगत हायस्कूल घाटटेमनी यांचा समावेश आहे.परीक्षा केंद्रावर मोबाईल बंदी आहे. विद्यार्थी किंवा पर्यवेक्षकांनी मोबाईल केंद्रावर आणू नये. पर्यवेक्षकांकडे मोबाईल आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.-महेंद्र मोटघरेशिक्षण विस्तार अधिकारी जि.प.गोंदिया.