शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

आताचे राजकारण केवळ लाभासाठी

By admin | Updated: August 9, 2015 01:48 IST

स्वातंत्र्याच्या लढाईत आणि त्या काळच्या राजकारणातही त्यागाची भावना होती. परंतु आता राजकारणात प्राप्तीची आणि लाभाची भावना आहे.

त्यागभावना संपली : स्वा.सं. सेनानी केवलचंद जैन यांचे परखड मतलोकमत मुलाखतनरेश रहिले  गोंदियास्वातंत्र्याच्या लढाईत आणि त्या काळच्या राजकारणातही त्यागाची भावना होती. परंतु आता राजकारणात प्राप्तीची आणि लाभाची भावना आहे. जो तो मला या राजकारणातून काय मिळेल याचाच विचार करतो. त्यागाची किंवा देण्याची भावना मुळीच दिसत नाही, अशी खंत स्वातंत्र संग्राम सेनानी केवलचंद जैन यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीतून व्यक्त केली.आॅगस्ट क्रांतीदिनाच्या पार्श्वभूमीवर जैन यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्वातंत्र्यकाळातील अनेक आठवणी जागविल्या. ते म्हणाले, देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी प्रत्येकाच्या मनात त्यागाची भावना होती. ती आताही प्रत्येक भारतीयाच्या मनात असणे आवश्यक आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत बेरार प्रांताचे (विदर्भ-मध्यप्रदेश) महत्व होते. एप्रिल ते आॅक्टोबर १९४७ दरम्यान यवतमाळ येथे चर्चा झाली. त्यावेळी पहिल्यांदा लोकांना देश पारतंत्र्यातून मुक्त होत आहे असे वाटले. १५ आॅगस्टची पूर्वसंध्या आणि १५ आॅगस्टचा दिवस लोकांनी जागून काढला होता.१९४२ मध्ये झालेल्या आंदोलनात इंग्रजाच्या विरोधात प्रचंड आक्रोश वाढला होता. आणखी जास्त काळ भारतात राहील्यास आपली हाणी होऊ शकते, असे इंग्रजांच्या लक्षात आले. ९ आॅगस्ट १९४२ चे आंदोलन सर्वात मोठे आंदोलन होते. सेवाग्राम येथे कॉंग्रेसची बैठक व मुंबईच्या गवालिया मैदानावर ‘करो या मरो, अंग्रेज भारत छोड़ो’ चे नारे लावण्यात आले. त्यावेळी रेडिओ आल्याने लोकही आंदोलनासोबत जुळले. आंदोलनाची तीव्रता पाहून सरकार घाबरले व त्यांनी लोकांना जेलमध्ये टाकण्याचा सपाटा सुरू केला. त्यामुळे ९ आॅगस्टला सर्वात जास्त अटक करण्यात आल्याचे जैन यांनी सांगितले.गोंदियातील अनेकांचा स्वातंत्र्यलढ्यात सहभागस्वातंत्र्याच्या लढ्यात जिल्ह्यातील अनेकांचा सहभाग होता. त्यांच्यासोबत चतुर्भूज जसानी, केशवराव इंगळे, पन्नालाल दुबे, सोहनलाल मिश्रा, बाबा जोगलेकर, गिरधारीलाल शर्मा, रघुनाथदास शर्मा, सुखदेव वासुदेव अग्रवाल यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत सहभाग घेतला, असे जैन म्हणाले.दोन वेळा आले होते महात्मा गांधीस्व.जवाहरलाल नेहरू १९४१ मध्ये कलकत्यावरून वर्धा जात होते. त्यांनी १० मिनीटे गोंदियाच्या रेल्वेस्थानकावर थांबून लोकांना मार्गदर्शन केले. सन १९२७ व १९३३ मध्ये महात्मा गांधी दोन वेळा भंडारा व दोन वेळा गोंदियात आले. १९३३ च्या गांधीजींच्या सभेत मोठी गर्दी होती.गोंदिया-भंडाऱ्यात फायरिंंग९ आॅगस्टला गोंदियात मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी झालेल्या लोकांना पोलिसांनी अटक केली. गोंदियात पहिल्यावेळी १२ ते १३ हजार लोकांनी पोलीस ठाण्याचा घेराव केला होता. अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी भंडारा येथे पाठविण्यात आले. ९ ते १६ आॅगस्टदररम्यान जिल्ह्यातील ४५० ते ४७५ लोकांना तुरूंगात टाकले होते. भंडारा व तुमसर येथे तसेच गोंदिया येथे फायरिंग झाली. यावेळी अटक झालेल्या महिलांमध्ये सात ते आठ महिलासुद्धा होत्या. चार वेळा भोगला तुरूंगवास१९४३ मध्ये भंडाराचे मोतीलाल लांजेवार यांनी विचारलेल्या पत्राला आपण पत्र लिहून उत्तर दिल्याने आपल्याला तुरूंगात जावे लागले, असे केवलचंद जैन यांनी यांनी सांगितले. आंदोलन उग्र असावे असे आपण लिहीले होते. त्यामुळे बॉम्ब तयार करण्याची योजना असावी या संशयावरून पोलिसांनी आपल्याला अटक केली. तसेच लांजेवार यांचे घर फोडून शोधमोहीम राबविली. जैन पहिल्यावेळी १९४१ मध्ये, दुसऱ्यावेळी १९४२, तिसऱ्यावेळी १९४३ तर चौथ्यावेळी १९४५ मध्ये तुरूंगात गेले. त्यावेळचे वातावरण उत्साही होते. वयाच्या १३ व्या वर्षातच आपण स्वातंत्र्यलढ्यात उतरल्याचे त्यांनी सांगितले.स्वातंत्र्य संग्राम सेनानी जैन १९८० ते १९८६ पर्यंत विधान परिषदेचे सदस्य होते. १९८२-८३ मध्ये ते राज्याचे नियोजन, विधायक कार्य, ऊर्जा, उत्पादन शुल्क, वन, मद्य निषेध या विभागाचे राज्यमंत्री होते. १९८४-८५ मध्ये उच्चाधिकार समितीचे सचिव होते. वडील कन्हैयालाल जैन हेसुद्धा काँग्रेस कार्यकर्ता होते. माझ्या वडीलांना पुस्तके वाचण्याचा छंद होता. अलाहाबादवरून त्यावेळी चांद नावाचे वृत्तपत्र निघत होते. त्या वृत्तपत्राने २०० पानांची ‘फासी’ नावाची पुरवणी काढली. त्यात शहीदांची संपुर्ण माहिती होती. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात १९४२ पर्यंत कुणाकुणाला फाशी झाली याची माहिती होती. यातून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्याच्या लढाईत उतरल्याचे जैन म्हणाले.