शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषद सभेचे इतिवृत्त आता संकेतस्थळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 13:26 IST

नगर परिषदेत घेण्यात येणाऱ्या सभांचे इतिवृत्त आता संबंधीत नगर परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कामकाजाबाबत नागरिकांना माहिती मिळावी, यासाठी नगर विकास विभागाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देकामकाज आता एका ‘क्लीकवर’नगर विकास विभागाचे आदेश

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेत घेण्यात येणाऱ्या सभांचे इतिवृत्त आता संबंधीत नगर परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कामकाजाबाबत नागरिकांना माहिती मिळावी, यासाठी नगर विकास विभागाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नगर परिषदेत शहर विकासाच्या दृष्टीने काय होत आहे हे आता कुणालाही एका ‘क्लीकवर’ बघता येणार आहे.शहराच्या विकासाची चाबी तेथील नगर परिषदेच्या हाती असते. यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून कोणत्या योजना, नवीन प्रयोग व काय कामकाज केले जात आहे, याची माहिती बहुतांश शहरवासीयांना नसते. नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात राबविण्यात येणाऱ्या प्रत्येकच कामासाठी सर्वसाधारण, स्थायी समिती तसेच विशेष सभा घेऊन त्यात प्रस्ताव ठेवावा लागतो. प्रस्तावाला सभेची मंजुरी मिळाल्यावर तसा ठराव घेऊनच पुढे त्यावर अंमलबजावणी करण्यात येते. सभेतील कामकाजाचा पुरावा म्हणून नगर परिषद सभेचे इतिवृत्त तयार केले जाते. आतापर्यंत सभेच्या इतिवृत्ताची फाईल तयार केली जात होती.कामकाजाबाबत जाणून घ्यावयाचे असल्यास नगर परिषद कार्यालयातून ते इतिवृत्त बघता येत होते.कामकाज जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. मात्र कार्यालयात जाऊन फाईल बघावी एवढी जाणीव व वेळ कुणाकडेही नाही. त्यामुळे कामकाजात अधिक पारदर्शकता यावी, कुणालाही नगर परिषद सभांचे इतिवृत्त बघता यावे, यासाठी नगर विकास विभागाने सभांचे इतिवृत्त नगर परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे असे आदेशच काढले आहेत.महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४, नगर विकास २५ जानेवारी २०१८ च्या खंड १० च्या उपखंडानुसार (ख) हे राज्यातील सर्वच नगर परिषद व नगर पंचायतींना बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, याअंतर्गत सभांच्या इतिवृत्तांची पीडीएफ फाईल संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर कुणीही संकेतस्थळावर ही माहिती वाचू शकतील तसेच त्याचे प्रिंट काढू शकतील.

सात दिवसांत स्वाक्षरीचे बंधनसभांचे इतिवृत्त अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता प्रत्येकच महिन्यात सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक आहे. शिवाय राजपत्राच्या उपखंड (क) नुसार घेण्यात आलेल्या प्रत्येकच सभेच्या इतिवृत्तावर पिठासीन अधिकाऱ्यांना (नगराध्यक्ष) सात दिवसांच्या आत स्वाक्षरी करणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. नगर विकास विभागाच्या आदेशाने काढलेले आदेश प्रशंसनीय आहे. नगराध्यक्षांनी दिलेल्या मुदतीत स्वाक्षरी न केल्यास मात्र दंडाची काहीच तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, यात मात्र शंका आहे.

टॅग्स :Governmentसरकार