शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

आता दोन शोषखड्ड्यांच्या शौचालयावरच मिळेल अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 01:24 IST

नरेश रहिले । लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : स्वच्छ भारत अभियानाला जिल्ह्यात भरघोष प्रतिसाद मिळाला. या अभियानांतर्गत आता तयार ...

ठळक मुद्दे३१ मार्चपर्यंत बांधकाम : १८ हजार ३०८ नवीन शौचालयांना मंजुरी, शासनाचा निर्णय

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्वच्छ भारत अभियानाला जिल्ह्यात भरघोष प्रतिसाद मिळाला. या अभियानांतर्गत आता तयार होणार होणाऱ्या शौचालयांसाठी दोन शोषखड्डे तयार करणे आवश्यक आहे. दोन शोष खड्डे तयार केल्यानंतरच लाभार्थ्याला अनुदान दिला जाणार आहे.स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत आधारभूत सर्वेक्षण २०१२ नुसार १८ हजार ३०८ कुटुंबांना शौचालय तयार करण्याची मंजुरी मिळाली आहे. या शौचालयाचे बांधकाम ३१ मार्चपर्यंत करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे शौचालयासह दोन शोषखड्डे आवश्यक आहे. जिल्ह्यात प्रत्येक पंचायत समितीची परिस्थती वेगवेगळी आहे. सेप्टीक टँंक व एक शोषखड्याच्या शौचालयाच्या तुलनेत दोन शोषखड्यांचे शौचालय अधिक उपयोगी आहे. सेप्टीक टँक व एक शोषखड्याच्या तुलनेत दोन शोषखड्याचे शौचालय तयार करायला जागाही कमी वेळही कमी लागतो. शोषखड्याच्या शौचालयातून दुर्गंधीमुक्त खत मिळते. याप्रकारे सेप्टीक टँकमधून बाहेर निघणाºया विष्ठेमुळे घाण पसरते. परिणामी आजार पसरतो. सेप्टीक टँकच्या विष्ठेच्या व्यवस्थापनात अनेक समस्या येतात. या व्यतिरिक्त सेप्टीक टँकमधून बाहेर निघणाºया विष्ठा व्यवस्थापनाला खर्चही अधिक येते. एक शोषखड्डा शौचालयाचा तो खड्डा भरल्यावर शौचालयाचा उपयोग करणे बंद केले जाते. त्यानंतर लोक उघड्यावर शौचास जाणे सुरू करतात.परंतु दोन शोषखड्डे असलेल्या शौचालयाचा एक शोषखड्ड भरल्यावर दुसºया शोषखड्याचा उपयोग होत असतो.या दोन्ही कारणामुळे दोन्ही शोषखड्यांचा उपयोग होऊ शकतो. नेमकी हीच बाब हेरून आधारभूत सर्वेक्षण २०१२ पासून सुटलेल्या ज्या कुटुंबाकडे शौचालय नाहीत अश्यांसाठी शौचालयाचे काम करण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी आता दोन शोषखड्डे असलेले शौचालय तयार करणे आवश्यक करण्यात आले. दोन शोषखड्याच्या शौचालयांना अनुदान मंजूर केले जाणार आहे. दोन शोषखड्यांच्या शौचालयात रूरल पॅन बसविण्यात येणार आहे.शोषखड्डे ४ फूट खोल असणे आवश्यक आहे. दोन्ही खड्यांमधील अंतर २ ते ३ फूट असणे आवश्यक आहे. रूरल पॅन दोन्ही शोषखड्यांच्या मधात २ ते ३ फूट अंतर असणे आवश्यक आहे. रूरल पॅन २५ ते ३० डिग्री उतारावर बसविणे आवश्यक आहे. पाण्याचे स्त्रोत कमीत-कमी १५ मीटर दूर अंतरावर शौचालय असावे. शोषखड्ड्यात वेंट पाईप बसवू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.अधिकाºयांची तळमळजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड यांच्या प्रयत्नाने जिल्हा पूर्वीच उघड्यावरील शौचमुक्त झाला. यासाठी जि.प. चे मुकाअ व उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वत: पहाटेच गावागावात पोहचतात. लोकांना मार्गदर्शन करतात.लोकांनी शौचालय तयार केले नाही त्यांना समजाविण्यात आले. दोन्ही अधिकाºयांच्या प्रयत्नामुळे ते गोंदिया जिल्ह्याचे चित्र बदलू पाहात आहेत.१८ हजार ३०८ नवीन शौचालयांना मंजुरीजिल्ह्यात १८ हजार ३०८ नवीन शौचालयांना मंजुरी देण्यात आली आहे. परंतु हे सर्व शौचालय दोन शोष खड्यांचे असतील. मंजूर झालेल्या शौचालयात गोंदियात सर्वाधिक ३ हजार ८८३, तिरोडा ३ हजार ३५७, गोरेगाव २ हजार ९३४, अर्जुनी-मोरगाव २ हजार १९१, देवरी २ हजार २०, सालेकसा १ हजार ५४३, आमगाव १ हजार २८६ व सडक-अर्जुनी तालुक्यातील १ हजार ९४ शौचालयांचा समावेश आहे.