शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग नव्हे, हा तर मृत्यूमार्गच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 22:24 IST

लाखनी, मुरमाडी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने अपघाताच्या घटना वेळोवेळी घडत असतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग हा लाखनी परिसरातील जनतेसाठी मृत्यूमार्ग बनला आहे.

ठळक मुद्देलाखनी शहरात ६३ अपघात : महामार्गावर गतिरोधकांची गरज

ऑनलाईन लोकमतलाखनी : लाखनी, मुरमाडी शहरातून जाणाऱ्यां राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने अपघाताच्या घटना वेळोवेळी घडत असतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग हा लाखनी परिसरातील जनतेसाठी मृत्यूमार्ग बनला आहे. वाढत्या अपघाताच्या प्रमाणामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे उड्डाण पुलाला मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात काम सुरु व्हायला उशीर आहे. तसेच उड्डाणपुलाचे काम तीन वर्षे चालणार असल्याने वाहतुकीचे नियंत्रण करणे अशोका बिल्डकॉम कंपनी व पोलीस स्टेशन समोर मोठे आव्हान असणार आहे.मागील वर्षी सन २०१७ ला लाखनी पोलीस स्टेशन अंतर्गत मुंडीपार ते केसलवाडा (फाटा) दरम्यान एकुण ६३ अपघात झाले आहेत. एकूण अपघातापैकी २० अपघातामध्ये २० लोक जागीच मरण पावले आहेत. तसेच ४३ अपघातामध्ये गंभीर जखमी व कायमचे अपंगत्व आलेले आहेत. याबाबत जनतेच्या मनात राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस ठाणे अधिकारी व कर्मचारी यांचे बद्दल प्रचंड दोन्ही बाजूला दाट लोकवस्ती, शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, न्यायालय असल्याने जनतेचे महामार्ग ओलांडून जाण्याचे प्रमाण जास्त आहे.अशोका बिल्डकॉम कंपनीकडे ठाणेदार यशवंत सोलसे यांनी पत्रव्यवहार करून पेट्रोलपंप चौक, तहसील चौक, सिंधी लाईन, लाखोरी फाटा, बसस्टॉप, मानेगाव फाटा, पिंपळगाव फाटा, मुंडीपार फाटा येथे गतीरोधक तात्काळ बसविण्यात येणे आवश्यक आहे.लाखनी शहराचा आठवडी बाजार मंगळवारला भरतो. आठवडी बाजारासाठी स्वतंत्र जागा आहे. परंतु गेल्या तीन वर्षापासून अर्धेधिक आठवडी बाजार राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर भरतो व राष्ट्रीय महामार्गावर लोक वाहने उभी करत असतात.तहसील चौकापासून ते सिंधी लाईन चौक पर्यंतच्या सर्व्हीस रोडवर भाजीपाल्यांची दुकाने लागलेली असतात. राष्ट्रीय महामार्गावर मार्चनंतर उड्डाणपुलाचे काम सुरु होणार आहे. त्यामुळे आठवडी बाजार हलविणे किंवा मुळ जागेवर नेणे आवश्यक असणार आहे.यापूर्वी महामार्गावरील सर्व्हीस रोडचे आठवडी बाजाराची दुकाने हटविण्यासाठी अशोका बिल्डकॉन व पोलीस विभागाने प्रयत्न केले. परंतु त्यांना यश मिळाले नाही. भाजीविक्रेते प्रशासनाला जुमानत नसल्याने अपघाताची घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अवैध पार्किंगची समस्याराष्ट्रीय महामार्गावर मुख्य रस्त्यावर ट्रक व इतर वाहने उभी असात तर सर्व्हीस रोडवर, ट्रक, मिनीडोअर, कार, आॅटो आदींची पार्कींग केली जाते. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. लाखनीच्या मुख्य बसस्थानकाजवळ, लाखोरी रोड फाटा, जयस्तंभ चौक, बाजार चौक, तहसील कार्यालयासमोरील चौका काळीपिवळी आॅटो उभे असतात. बाजार चौक व तहसील चौकातील आॅटोचालकाच्या प्रवासी वाहतुकीला जनता कंटाळली आहे. बस थांबण्याच्या जागेवर आॅटो उभे असतात. त्यामुळे अनेकदा बसला थांबण्यासाठी जागा नसते व बसवाहक गाडी पुढे नेतात. यामुळे आॅटोवाहकासाठी नियमावली असणे आवश्यक आहे.