शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याचा जल्लोष नव्हे... पोटाची भूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:11 IST

देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे झाली. पण एका आठ वर्षाच्या चिमुकलीला पोटाची खळगी भरण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीचा आधार घ्यावा लागतो. कशासाठी? कचरा वेचून पोट भरण्यासाठी!एकीकडे देशाच्या स्वातंत्र्यांचा जल्लोष सुरु होता.

ठळक मुद्देसंडे अँकर । स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधणाच्या दिवशीच चिमुकलीची पायपीट

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : .देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे झाली. पण एका आठ वर्षाच्या चिमुकलीला पोटाची खळगी भरण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीचा आधार घ्यावा लागतो. कशासाठी? कचरा वेचून पोट भरण्यासाठी!एकीकडे देशाच्या स्वातंत्र्यांचा जल्लोष सुरु होता. शाळकरी चिमुकले कागदी राष्ट्रध्वज हातात घेऊन देशाभिमान दर्शवित होती. तर दुसरीकडे जल्लोष, राष्ट्रध्वज बघत-बघत ती कचऱ्यात पोटाची भूक शोधत होती. पोटाची खळगी भरण्यासाठी कचºयात स्वातंत्र्य शोधणाºया त्या बाल मजुराची व्यथा मन सुन्न करणारी तेवढीच क्लेशदायक आहे.एकीकडे स्वातंत्र्यांचा जल्लोष तर दुसरीकडे त्याचदिवशी रक्षाबंधनाचा सन सकाळी आठची वेळ, आठ वर्षाची चिमुकली हातात पांढऱ्या रंगाची चुंगडी घेऊन कचऱ्यातून स्वत:चे आयुष्य वेचत होती. गोरेगावच्या मुख्य रस्त्याच्या पलीकडे कऱ्यातून पोटाचा प्रश्न सोडविण्याऱ्या चिमुकलीकडे स्थानिक दानविराचे लक्ष गेले असेल नसेल पण जे काही भिषण चित्र नजरेआड झाले. ते खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य कुणाला मिळाले? यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील त्या चिमुकलीला कुठे राहतेस, काय करतेस, तुझा फोटो घेतो. असे लोकप्रतिनिधीनीने म्हटल्यावर तिचे स्मित हास्य कॅमेरात कैद झाले आणि एक भिषण सत्य पुढे आले.कसले स्वातंत्र्य कसले सन, कचºयाच्या मिळकतीतूनच पोट भरावे हे तिचे खरे स्वातंत्र्य आणि पोट भरल्यावर मिळणारा आनंद म्हणजे खरा सन. त्या चिमुकलीचा हा कल्पनाविलास जगण्यातले खरे संदर्भ सांगणारे असले तरी हे वेदनादायी आयुष्य स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतरही कुणी उपभोेगत असेल तर या देशातील लोकशाहीला हे झापड मारण्यासारखे आहे.देशात समाजात दारिद्र्य मोठ्या प्रमाणावर आहे.अशिक्षीतपणा हेच दारिद्र्याचे मुळ कारण आहे. असे असले तरी, शासन दरबारी असलेल्या विविध योजना या चिमुकल्यापर्यंत का पोहचत नाही हा खरा प्रश्न आहे.शाळाबाह्य मुले शैक्षणिक प्रवाहात आली पाहिजे. मात्र कागदावर शाळाबाह्य मुले शुन्य दाखविणाऱ्या शिक्षण विभागाला असे कचरा वेचणारे चिमुकले दिसत नाही याचे अश्चर्य व्यक्त होणे स्वाभाविकच आहे. त्या आठ वर्षाच्या मुलीला कचरा वेचून पोटाची खळगी भरण्याची वेळ यावी, ही घटना मन सुन्न करणारी आहे.ज्या वयात आशावाद उराशी बाळगून मनसोक्त खेळण्याची, शाळेत जाण्याची वेळ असताना त्या चिमुकलीला पोटाचा प्रश्न सतावत असेल तर यापेक्षा मोठे दुदैव काय असेल. देशात-जिल्ह्यात असे कचरा वेचून स्वत:चा उदरनिर्वाह करणारे बरेच असतील आणि आहेत. पण ऐन स्वातंत्र्याच्या व रक्षाबंधनाच्या दिवशीच एखादी चिमुकली स्वातंत्र्यदिनात सामील न होता चक्क सकाळी-सकाळी कचरा वेचतांना दिसत असेल तर तिला खरेच स्वातंत्र्य मिळाले काय याविषयी चिंतन व्हायलाच पाहिजे.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन