लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : २९ मे रोजी चामोर्शी नगर पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होऊ घातली आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी भाजपच्या वतीने प्रज्ञा धीरज उराडे व काँग्रेसच्या वतीने सुमेध माणिकराव तुरे यांनी मुख्याधिकारी आर्शिया जुही यांच्याकडे नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र सादर केले. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत चामोर्शी येथे काँग्रेस व भाजप या दोन पक्षात चुरस निर्माण होणार असून दोन्ही पक्षाच्या वतीने मोर्चेबांधणीस वेग आला आहे.भाजपच्या वतीने प्रज्ञा उराडे यांनी नामनिर्देश अर्ज सादर करताना आ. डॉ. देवराव होळी, नगरसेवक प्रमोद पिपरे, स्वप्नील वरघंटे, दिलीप चलाख, गटनेते प्रशांत येगलोपवार, मनमोहन बंडावार, रोशनी वरघंटे, विनोद पालारपवार, कविता किरमे, शिवसेनेचे विलास ठोंबरे, मंजुषा रॉय, धीरज उराडे, विनोद पेशेट्टीवार, विनोद अल्सावार, बंडू कुमरे, निरज रामानुजवार, राजू चुधरी, भाजराज भगत, जयराम चलाख आदी उपस्थित होते.काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी सुमेध तुरे यांचा नामांकन अर्ज सादर करताना नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, गटनेते विजय शातलवार, नगरसेवक प्रमोद वायलालवार, नितीन वायलालवार, विनोद खोबे, रियाज शेख, सविता पिपरे व नगरसेवक हजर होते.
काँंगे्रस व भाजपकडून नामांकन दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 01:20 IST
२९ मे रोजी चामोर्शी नगर पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होऊ घातली आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी भाजपच्या वतीने प्रज्ञा धीरज उराडे व काँग्रेसच्या वतीने सुमेध माणिकराव तुरे यांनी मुख्याधिकारी आर्शिया जुही यांच्याकडे नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र सादर केले.
काँंगे्रस व भाजपकडून नामांकन दाखल
ठळक मुद्देनगराध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी : दोन्ही पक्षांत चुरस, आमदारांची प्रतिष्ठा पणाला