शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील एकही शाळा बंद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 05:00 IST

जिल्ह्यातही वर्ग ८ ते १२ पर्यंतच्या शाळा सुरू करण्यास शिक्षण विभागाने परवानगी दिल्याने आजघडीला जिल्ह्यातील ३७६ पैकी २७४ शाळांची घंटा वाजली आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये विद्यार्थीच कोरोना बाधित निघाल्याने शाळाच बंद करण्याची पाळी आली आहे. मात्र सुदैवाने जिल्ह्यात असा प्रकार घडलेला नाही. जिल्ह्यात सुरू झालेल्या २७४ शाळा सुरू झाल्यानंतर त्यातील एकही शाळा आतापर्यंत बंद करण्याची पाळी आलेली नाही.

ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोना नियंत्रणात : २७४ शाळांमध्ये वाजली घंटा

कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आता नियंत्रणात आली आहे. यामुळे शाळा सुरू करण्यास निर्माण झालेले वातावरण बघून राज्य शासनाने स्थानिक स्तरावर निर्णय घेऊन शाळा करण्यास परवानगी दिली. त्यानुसार, जिल्ह्यातही वर्ग ८ ते १२ पर्यंतच्या शाळा सुरू करण्यास शिक्षण विभागाने परवानगी दिल्याने आजघडीला जिल्ह्यातील ३७६ पैकी २७४ शाळांची घंटा वाजली आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये विद्यार्थीच कोरोना बाधित निघाल्याने शाळाच बंद करण्याची पाळी आली आहे. मात्र सुदैवाने जिल्ह्यात असा प्रकार घडलेला नाही. जिल्ह्यात सुरू झालेल्या २७४ शाळा सुरू झाल्यानंतर त्यातील एकही शाळा आतापर्यंत बंद करण्याची पाळी आलेली नाही.

विद्यार्थ्यांना मिळाले आपले मित्रमागील मार्च महिन्यापासून शाळा बंद असल्याने घरातच कोंडून रहावे लागत होते. मात्र आता शाळा सुरू झाल्याने आपल्या मित्रांना भेटता आले. नियमात राहून का होईना मात्र अभ्यासासोबतच आता मित्रांच्या भेटीगाठी तरी होत आहे.- अभिषेक वाघमारे (विदयार्थी)

शाळा सुरू झाल्याने आता घराबाहेर पडता येत आहे. नाहीतर मागील वर्षापासून घरातच रहावे लागत होते. आता अभ्यास ही होत असतानाच मित्रांसोबतही भेटता येत आहे. मात्र पालक अद्यापही शाळेत पाठविण्यास तयार नाही त्यामुळे अडचण होते. - विनोद तुरकीवार (विद्यार्थी)

मागील वर्षापासून शाळा बंद असल्याने मुले घरात कोंडून होतो. घरात राहून त्यांना कंटाळा आला होता. शिवाय ऑनलाईनमध्ये हवा तसा अभ्यास होत नव्हता. आता शाळा सुरू झाल्याने मुले अभ्यास करीत असून त्यांना घराबाहेरही पडता येत आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी अजुनही थोडा धोका कायम आहे. - देवीदास कोरटे (पालक)

सर्व शाळा सुरु-  राज्य शासनाच्या आदेशानुसार पालकांची परवानगी घेऊन जिल्ह्यातील २७४ शाळा सुरू करण्यात आल्या असून त्यातील एकही शाळा बंद झाली नाही.-  शाळा सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील २८९०० पालकांनी संमती दिली असून त्यानुसार शाळा सुरू आहेत. यात गोंदिया तालुक्यातील सर्वात शाळा सुरू असल्याचे दिसत आहे.- जिल्ह्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात असून आतापर्यंत एकही विद्यार्थी बाधित निघालेला नाही. त्यामुळे शाळा बंद करण्याची गरजच पडलेली नाही.

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या