शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मतदारयादीत नाव नाही, नोंदणीसाठी तातडीने अर्ज करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2021 05:00 IST

एका मताव्दारेच एखादी योग्य व्यक्ती निवडून आल्यास चांगली कामे होतात. तेथेच चुकीची व्यक्ती निवडून आल्यास विकास कामांपासून क्षेत्र माघारते. यामुळेच प्रत्येकाने आपले बहुमूल्य मत योग्यरीत्या वापरावे असे सांगितले जात असून या बहुमूल्य मतांसाठीच ५ वर्षे राज्य करणारी व्यक्ती तुमच्यापर्यंत मताची मागणी करण्यासाठी येते. यामुळेच प्रत्येकाने मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य समजून नक्की मतदान करावे, असे निवडणूक आयोगाकडूनही सांगितले जाते.

कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोकशाही राज्यात एका-एका मतालाही मोठे महत्त्व असून एक मत एखाद्याचे भाग्य बनवू शकते तर हेच एक मत एखाद्याला नेस्तनाबूदही करू शकते. या एका मताव्दारेच एखादी योग्य व्यक्ती निवडून आल्यास चांगली कामे होतात. तेथेच चुकीची व्यक्ती निवडून आल्यास विकास कामांपासून क्षेत्र माघारते. यामुळेच प्रत्येकाने आपले बहुमूल्य मत योग्यरीत्या वापरावे असे सांगितले जात असून या बहुमूल्य मतांसाठीच ५ वर्षे राज्य करणारी व्यक्ती तुमच्यापर्यंत मताची मागणी करण्यासाठी येते. यामुळेच प्रत्येकाने मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य समजून नक्की मतदान करावे, असे निवडणूक आयोगाकडूनही सांगितले जाते. आता येणारा काळ निवडणुकांचा काळ राहणार असून यातूनच नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी काम सुरू झाले आहे. १ ते ३० नोव्हेंबरपर्यंत यासाठी विशेष मोहीम राबविली जात असून त्यात वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्यांना नाव नोंदविण्यासाठी संधी मिळाली आहे. यामुळे या संधीचा लाभ घेत नवमतदारांना आपले नाव नोंदवून येणाऱ्या निवडणुकांत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. 

अशी करा नोंदणी - आपल्या देशात वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीला मतदानाचा हक्क देण्यात आला आहे. यामुळे वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्यांनी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी फॉर्म क्रमांक-६ भरावयाचा आहे. या फॉर्मवर बीएलओंची सही लागते व तेच तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात हे फॉर्म जमा करतात. त्यानंतर मतदार यादीत नाव नोंदणी केली जाते. यासाठी सध्या मोहीम सुरू असून बीएलओ ही सर्व कामे करीत आहेत.

पहिल्यांदाच बजावणार मी माझा हक्क ! निवडणुकीत आतापर्यंत बॅलेटवर शिक्का मारला जात होता. मात्र आता मशीनचे बटण दाबले जात असल्याचे माहिती आहे. प्रत्यक्षात बघितले नसून आतापर्यंत मतदानाचा हक्का बजावलेला नाही. मात्र आता १८ वर्षे पूर्ण झाली असून मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अर्ज केलेला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांत मतदानाचा हक्क बजावता येणार असून त्याची उत्सुकता आहे. -विलास गुरव

निवडणुकीत मतदान कसे करतात याबाबत उत्सुकता आहे. आतापर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत होत्या. तर आता मशीनव्दारे निवडणुका घेतल्या जात आहेत. यामुळेच मतदान कसे करायचे याबाबत उत्सुकता वाढली आहे. आता यादीत नाव आले असून येत्या निवडणुकांत मतदानाचा हक्का बजावणार. -राहुल बागडे 

 

टॅग्स :VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग