शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘कचरावाले नाही’, आता ‘स्वच्छता ताई-दादा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 12:48 IST

आपण केलेला कचरा वेचून नेताना कित्येक महिला, पुरूष व चिमुकलेही दिसतात. समाजाने त्यांना ‘कचरावाले’ ही उपाधीच देऊन टाकली आहे. गोंदिया नगर परिषद त्यांना ‘स्वच्छता ताई व स्वच्छता दादा’ म्हणून संबोधणार असून त्यांच्याकडून शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी मदत घेणार आहे.

ठळक मुद्देमाणूस म्हणून मिळणार दर्जाकचरा वेचणाऱ्यांची गोंदिया नगर परिषद घेणार मदत

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपण केलेला कचरा वेचून नेताना कित्येक महिला, पुरूष व चिमुकलेही दिसतात. समाजाने त्यांना ‘कचरावाले’ ही उपाधीच देऊन टाकली आहे. त्यांचे काम व मिळालेल्या उपाधीमुळे समाजात त्यांना दर्जा राहिलेला नाही. मात्र नगर परिषद त्यांना समाजात माणूस म्हणून दर्जा मिळवून देणार आहे. यासाठी नगर परिषद त्यांना ‘स्वच्छता ताई व स्वच्छता दादा’ म्हणून संबोधणार असून त्यांच्याकडून शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी मदत घेणार आहे.शहरात सध्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. यामुळे दररोज निघणाऱ्या सुमारे ६५ मेट्रीक टन कचऱ्याची विल्हेवाट लावताना नगर परिषदेलाही घाम फुटत आहे. यातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रीया करून त्यापासून गांडूळ खत निर्मितीसाठी नगर परिषदेने गांडूळ खत निर्मितीचा प्रयोग सुरू केला आहे. मात्र सुक्या कचऱ्याची समस्या ‘जैसे थे’ आहे. हा कचरा मोक्षधाम परिसरात टाकावा लागत असल्याने या परिसरालाच कचऱ्याचा विळखा बसला आहे. सुक्या कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी नगर परिषदेने एक वेगळी शक्कल लढविली आहे. या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी नगर परिषद कचरा वेचणाऱ्यांची मदत घेणार आहे. कचरा वेचणारे शहरात फिरून रस्त्यावर पडलेले खरडे व प्लास्टिक वेचून उदरनिर्वाह करतात. आता न फिरता त्यांना एकाच ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात खरडे व प्लास्टीक मिळणार आहे. नगर परिषद त्यांना ते नि:शुल्क देणार असून ते विकून त्यांना पैसा मिळणार आहे. कचऱ्यातून प्लास्टीक व खरडे निघाल्यास त्यापासून नगर परिषदेला खत निर्मितीही येईल. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हे फायद्याचे ठरणार असल्याने नगर परिषद कचरा वेचणाऱ्यांची मदत घेणार आहे.‘स्वच्छता ताई-स्वच्छता दादां’चा दर्जा कचरा वेचणाऱ्यांना समाजात मान मिळावा व माणूस म्हणून त्यांनाही जगता यावे यासाठी नगर परिषदेने शहरातील सुमारे २८ कचरा वेचणाऱ्या महिला-पुरूषांचे गट तयार केले आहेत. त्यांना ओळखपत्र दिले आहे. त्यांना आता ‘स्वच्छता ताई-स्वच्छता दादा’ म्हणून संबोधले जाणार आहे.कचरा वेचणारेही माणूस आहेत. त्यांचे जीवनमान सुधारणे आणि सोबतच कचऱ्याची समस्या सोडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठीच त्यांची मदत घेतली जाणार आहे.- अशोक इंगळे नगराध्यक्ष, गोंदियाआपण केलेला कचरा वेचून शहराला स्वच्छ ठेवण्याचे काम कचरा वेचणारे करतात. यामुळेच कचरा वेचणारे न म्हणता त्यांना ‘स्वच्छता ताई-स्वच्छता दादा’ संबोधण्याची संकल्पना आली.

- चंदन पाटील मुख्याधिकारी, न.प.गोंदिया

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्न