शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेत निधीचा ठणठणाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 12:57 IST

राज्य शासनाच्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना शासनाकडून अद्याप निधी न आल्याने संकटात आली आहे.

ठळक मुद्देबँकेत फिक्स डिपॉझिटमुलींचे भविष्य घडविण्याचे स्वप्न भंगले

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य शासनाच्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना शासनाकडून अद्याप निधी न आल्याने संकटात आली आहे. त्यामुळे ज्यांनी आपल्या मुलींना या योजनेंतर्गत सुंदर व सुरक्षित भविष्य देण्याचा विचार केला, त्यांचे स्वप्न भंग होण्याची शक्यता आहे.माझी कन्या भागश्री योजनेंतर्गत एका मुलीनंतर जर कोणत्या कुटुंबाने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली, तर त्या मुलीच्या नावावर महाराष्ट्र बँकेच्या शाखेत ५० हजार रूपयांचा फिक्स डिपॉझिट केले जाते. जर दोन मुलींनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या दोन्ही मुलींच्या नावे २५-२५ हजार रूपयांचे फिक्स डिपॉझिट केले जाते. ही रक्कम राज्य शासनाच्या वतीने उपलब्ध करुन दिली जाते. सहा-सहा वर्षांनंतर लाभार्थी त्या रकमेच्या व्याजाची उचलही करू शकतात. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर जर त्या दहावी पास आहेत व त्यांचे लग्न झाले नाही तर त्यांना जमा रक्कम व व्याजाची रक्कम एकत्र बँकेतून मिळते. एखादा पालक जर गरीब आहे तर या रकमेमुळे मुलीच्या लग्नाची त्याची चिंता मिटू शकते.याच दृष्टीकोनातून शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजनेची सुरूवात १ एप्रिल २०१६ पासून राज्य शासनाने केली. तसेच १ आॅगस्ट २०१७ पासून सुधारित ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेची सुरूवात झाली. जिल्हा परिषद गोंदियाच्या महिला व बाल कल्याण विभागाला यासंदर्भात विचारणा केली असता ७ आॅगस्ट २०१७ पर्यंत ४५ अर्ज आलेले आहेत. ते शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. मात्र अद्यापही शासनाकडून सदर लाभार्थी मुलींच्या नावाने फिक्स डिपॉझिटमध्ये जमा करण्यासाठी रक्कम उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचे सांगितले.विशेष म्हणजे ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेच्या आधी १ जानेवारी २०१४ पासून सुकन्या योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत थेट अर्ज करायचे होते. आयुक्त कार्यालयात करण्यात आलेल्या अर्जांवर आतापर्यंत कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. सुकन्या योजनेतही शासनाने कोणताही निधी उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे ही योजना संकटात आल्याचे चित्र आहे.आम्ही शासनाकडे लाभार्थ्यांचे अर्ज पाठविले आहेत. परंतु आतापर्यंत कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. लाभार्थी मुलींच्या नावे बँकेत फिक्स डिपॉझिट करण्यासाठी शासनाकडून रक्कमही उपलब्ध करुन देण्यात आली नाही.- बी.डी.पारखे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग, जि.प. गोंदिया

टॅग्स :Governmentसरकारwomen and child developmentमहिला आणि बालविकास