शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

अवजड वाहनांना शहरात नो एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 05:00 IST

शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने सामान्य जनतेला धोका, गैरसोय, अडथळा निर्माण होवू नये यासाठी पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१)(ब)(क) नुसार शहरामध्ये प्रवेश करणाऱ्या जड व अवजड वाहनांना ज्या वाहनांची वहन क्षमता १२ टन किंवा त्यापेक्षा जास्त आहे. अशी वाहने सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत पुढे नमूद केलेल्या मार्गावरुन व इतर तत्सम मार्गावरुन १ जानेवारी २०२१ पासून गोंदिया शहरात जड, अवजड वाहनांना प्रवेश राहणार आहे.

ठळक मुद्देउशीरा आली प्रशासनाला जाग : नवीन वर्षापासून होणार अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया :  शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभाग आणि प्रशासनाने उशीरा का होईना आता पावले उचचली आहे. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी १ जानेवारीपासून शहरात सकाळी ९ ते सायंकाळी ९ या कालावधीत अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने सामान्य जनतेला धोका, गैरसोय, अडथळा निर्माण होवू नये यासाठी पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१)(ब)(क) नुसार शहरामध्ये प्रवेश करणाऱ्या जड व अवजड वाहनांना ज्या वाहनांची वहन क्षमता १२ टन किंवा त्यापेक्षा जास्त आहे. अशी वाहने सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत पुढे नमूद केलेल्या मार्गावरुन व इतर तत्सम मार्गावरुन १ जानेवारी २०२१ पासून गोंदिया शहरात जड, अवजड वाहनांना प्रवेश राहणार आहे.बायपास रोडवरील पतंगा चौकपासून बालाघाटकडे जाणाऱ्या व पतंगा चौकपासून गोरेगावकडे जाणाऱ्या मार्गावर दोन्ही बाजूस ५०० मीटरपर्यंत जड वाहनांना नो पार्कींग झोन ठेवण्यात आला आहे. असा असेल वाहतुकीचा मार्ग त्यानुसार कारंजा टी-पाईंटकडून गोंदिया शहराकडे येणारा मुख्य रस्ता, पतंगा चौक ते फुलचूर मार्गे गोंदिया शहराकडे येणारा मुख्य रस्ता, राजाभोज चौक ते छोटा गोंदिया मार्गे गोंदिया शहराकडे येणारा रस्ता, मरारटोली जंक्शनकडून गोंदिया शहराकडे येणारा मुख्य रस्ता, राणी अवंतीबाई चौक ते छोटा पाल चौककडे येणारा रस्ता. कुडवा नाका ते गोंदिया शहराकडे येणारा मुख्य रस्ता. बायपास रोडवरील किसान चौक ते फुलचूर गावाकडे येणारा रस्ता, गोंदिया शहरातील मरारटोली बस स्थानकाच्या दिशेकडून जयस्तंभ चौकाकडे मोठ्या उड्डाण पुलावरुन जड, अवजड वाहनांना येण्यास सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंदी राहील. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राज्य सरकारी गोडावून रामनगर येथे माल घेवून येणाऱ्या जड,अवजड वाहनांना कुडवा नाका ते पालचौक मार्गे राज्य सरकारी गोडावून जाण्याकरीता दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत प्रवेश बंदीतून सूट देण्यात येत आहे. परंतु या वाहनांचा वेग हा ताशी २० कि.मी. पेक्षा जास्त राहणार नाही.या वाहनांना असणार सूट केंद्र शासन व राज्य शासन, गोंदिया नगरपालिका, जिल्हा परिषद किंवा इतर महामंडळाच्या मालकीची शासकीय कामासाठी फिरणारी वाहने. अग्नीशमन दल, सैन्यदल तसेच केंद्र व राज्य शासनाचे पोलीस दलाची जड वाहने. केंद्र शासन,राज्य शासन, स्थानिक स्वराज्य, संस्था व महामंडळे यांचेद्वारे शासकीय कामात कायदेशिररित्या गुंतलेली खाजगी जड वाहने. दूध, पेट्रोल,डिझेल,केरोसीन, गॅस यासारख्या जीवनावश्यक वस्तूचा गोंदिया शहरात पुरवठा करणारी जड वाहने, प्रवाशी वाहतूक करणारी शासकीय, निमशासकीय तथा खाजगी वाहने यांना सूट देण्यात आली आहे. मात्र यासाठी त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे अणे आवश्यक आहे.  

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडी