राज्य शासनाने कोरोना विषाणू या साथ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय बंद करण्यात आले आहेत. या काळात अत्यंत तातडीचा करावयाचा पत्रव्यवहार टपाल नागरिकांनी ई-मेलव्दारे संबंधित विभागास करावा, असे जिल्हाधिकारी प्रशासनाने कळविले आहे. जिल्हा प्रशासन यांच्याकडून वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, दैनंदिन व वैयक्तिक कामासाठी नागरिक तसेच अन्य सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, समाजसेवक यांची मुख्य कार्यालयात मोठ्या प्रमाणात वर्दळ होत असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालयात प्रवेश बंद करण्यात आला आहे. परंतु नागरिकांची कोणत्याही स्वरूपात गैरसोय होऊ नये यासाठी इमेलद्वारे पत्रव्यवहार करता येईल. त्यासाठी संबंधित कार्यालयाचे ई-मेल आयडी rdcgon@gmail.com व collector.gondia@maharashtra.gov.in या मेलवर करता येईल. या काळात नागरिकांचे कामे प्रलंबित राहणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आता नागरिकांना नो एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:29 IST