शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जंतनाशक गोळ््यांपासून एकही बालक वंचित राहू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 21:09 IST

बालकांच्या आरोग्यासाठी जंतनाशकाच्या गोळ्या देणे गरजेचे असून सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे. जेणेकरून शाळा व अंगणवाडी स्तरावरील एकही बालक जंतनाशक गोळ््यांच्या लाभापासून वंचित राहू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : १० आॅगस्ट रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बालकांच्या आरोग्यासाठी जंतनाशकाच्या गोळ्या देणे गरजेचे असून सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे. जेणेकरून शाळा व अंगणवाडी स्तरावरील एकही बालक जंतनाशक गोळ््यांच्या लाभापासून वंचित राहू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १० आॅगस्ट राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेच्या अनुषंगाने आयोजित जिल्हा समन्वय समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.टी.बी.खंडाते, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी टी.व्ही.पौनीकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उल्हास नरड, आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक अधिकारी व्ही.व्ही.तितीरमारे प्रामुख्याने उपस्थित होते.१० आॅगस्ट रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १ ते १९ वर्ष वयोगटातील तीन लाख ४३ हजार २७१ बालकांना जंतनाशकाच्या गोळ््या देण्यात येणार आहे. त्याकरीता १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुलामुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे यासाठी ही मोहिम राबविण्यात येत आहे.ही मोहीम यशस्वीपणे राबविण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य, महिला व बालकल्याण, आदिवासी विकास, पाणी पुरवठा व पंचायत विभाग दक्षतापूर्वक काम करीत आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेच्या जिल्हा समन्वय समितीच्या सभेला सर्व तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. सभेचे सादरीकरण जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी अधिकारी डॉ.अनंत चांदेकर यांनी केले. आभार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांनी मानले.असा दिला जाणार डोजजंताचे राऊंड वर्म, व्हीप वर्म व हुक वर्म असे तीन प्रकार असून त्यांचा मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. जसे- जंतसंसर्गाचा बालकांच्या रक्तक्षय (अनिमिया), अतिसार, मळमळणे, भुक मंदावणे, थकवा व अस्वस्थपणा, कुपोषण, शौचाच्या वेळेस रक्त पडणे, पोटाला सुज येणे इत्यादी परिणाम होतात. वयोगटानुसार १ ते २ वर्ष वयोगटात अर्धी गोळी (२०० मि.ग्रॅम) व ३ ते १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना पूर्ण गोळी (४०० मि.ग्रॅम) विनामूल्य देण्यात येणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्यcollectorजिल्हाधिकारी