शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

भांडी व्यवसायातून ‘निशा’ला मिळाली आर्थिक उन्नतीची दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:20 IST

अत्यंत दारिद्र्यावस्थेत जीवन जगणाºया सालेकसा तालुक्याच्या झालिया येथील अनामिका स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या सदस्य निशा कीर्ती रामटेके यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने व सहयोगींच्या मार्गदर्शनातून पतीला भांडी विक्रीचा व्यवसाय लावून दिला. त्यातून त्यांनी आपली आर्थिक उन्नती साधत परिस्थतीत बदल घडवून आणला.

ठळक मुद्देअनामिका महिला बचतगट : तिन्ही व्यवसायांसाठी माविमचे मार्गदर्शन व सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अत्यंत दारिद्र्यावस्थेत जीवन जगणाºया सालेकसा तालुक्याच्या झालिया येथील अनामिका स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या सदस्य निशा कीर्ती रामटेके यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने व सहयोगींच्या मार्गदर्शनातून पतीला भांडी विक्रीचा व्यवसाय लावून दिला. त्यातून त्यांनी आपली आर्थिक उन्नती साधत परिस्थतीत बदल घडवून आणला. ही बाब महिलांना प्रेरणा देणारी ठरली आहे.बिडी बांधणे व कबाडीचे सामान घेणे या छोटाशा व्यवसायातून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे, असा निशा व त्यांच्या कुटुंबाचा नित्यक्रम होता. कुटुंबातील सहा सदस्य मजुरी करीत होते.कुटुंब मोठे असल्यामुळे अल्पशा मिळकतीतून भागत नव्हते. निशा आधी गटात नव्हत्या. मासिक १०० रूपये कसे भरणार या भीतीपोटी त्या महिला बचत गटात येण्यास घाबरत होत्या. परंतु माविम प्रकल्पामुळे गटाबद्दल चांगले मार्गदर्शन मिळाले. तसेच सीआरपी व सहयोगीनींच्या समजावण्यावरून त्यांनी गटात प्रवेश केला.त्यांनी सर्वप्रथम गटाच्या माध्यमातून आयसीआयसीआय बँकेमधून ४० हजार रूपये व फिरता निधी म्हणून १० हजार रूपये असे एकूण ५० हजार रूपयांचे कर्ज घेतले. या कर्जातून त्यांनी पतीला भांडी (बर्तन) विकण्याचा व्यवसाय लावून दिला. त्यांचे पती दुचाकी वाहनाने जावून भांडी विकत आहेत. त्यात त्यांना चांगला लाभ मिळाला. जवळपास भांडी विक्रीचे दुकान नसल्यामुळे नागरिकांना आमगावला जावून भांडी खरेदी करावी लागत होती. त्यामुळे त्यांनी सदर व्यवसायाला प्राधान्य देवून तो सुरू केला.त्यानंतर त्यांनी आणखी दुसरा व्यवसाय करण्याचे ठरविले. पुन्हा २५ हजार रूपयांचे कर्ज घेवून दाळ, तीळ, चना, वाटाणे आदी वस्तूंची गावात जावून विक्री करण्यास सुरूवात केली. त्यातही त्यांना चांगला फायदा मिळत आहे. यामुळे पुन्हा त्यांनी आयसीआयसीआय बँकेमधून ८७ हजार ५०० रूपयांचे कर्ज घेतले. त्यातून त्यांनी भांडी दुकानात वाढ केली. लग्नसराईच्या हंगामात या व्यवसायातून त्यांना चांगला नफा मिळाला. तसेच ते कर्जाची परतफेड दर महिन्याला ठरलेल्या तारखेला नियमित करीत आहेत.कर्ज घेऊन छोटे-मोठे व्यवसाय करानिशा रामटेके यांची गटात येण्यापूर्वीची परिस्थिती व गटात आल्यानंतरच्या परिस्थितीत खूप बदल झालेला आहे. आता त्यांच्या हाती तीन व्यवसाय आहेत. गटात असल्यामुळेच त्यांची आजची परिस्थिती बदलली आहे. आता त्या आपले कुटुंब चांगल्याप्रकारे सांभाळत आहेत. त्यांना गटाच्या माध्यमातून कमी व्याजाची रक्कम मिळाली आहे. तर व्यवसाय करण्यासाठीही मदत होत आहे. स्वत:च्या व्यवसायामुळे कर्जाची वेळेवर परतफेडही करीत आहेत. त्यामुळे बचत गट तयार करा व कर्ज घेवून छोटे-मोठे व्यवसाय करा, असा संदेश त्यांनी इतर महिलांना दिला आहे.बचत गटाच्या माध्यमातून मिळाली चालनाझालिया गाव सालेकसापासून १० किमी. अंतरावर आहे. गावात माविमचे १७ बचत गट आहेत. त्यात अनामिका स्वयंसहायता महिला बचत गट महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातून (एमएसआरएलएम) तयार झाला आहे. या गटाची स्थापना २६ जून २०१४ रोजी झाली असून सदस्य संख्या १२ आहे. यात यात एससी ५, ओबीसी ४ व एनटीच्या ३ महिलांचा समावेश आहे. गटाची मासिक बचत प्रत्येकी १०० रूपये आहे. या बचत गटाच्या माध्यमातूनच आपल्याला चालना व प्रेरणा मिळाल्याचे निशा रामटेके यांनी सांगितले.