शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

महिनाभरात १०० ग्राहक झालेत ‘निर्भय’

By admin | Updated: February 18, 2015 01:31 IST

पाणी विक्री रक्कम व त्यावरील व्याज अशी एकूण १० कोटी ६४ लाख ८५ हजार ३०१ रूपयांची थकबाकी वसुलीच्या टेंशनमध्ये असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या मदतीला शासनाने निर्भय योजना दिली.

गोंदिया : पाणी विक्री रक्कम व त्यावरील व्याज अशी एकूण १० कोटी ६४ लाख ८५ हजार ३०१ रूपयांची थकबाकी वसुलीच्या टेंशनमध्ये असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या मदतीला शासनाने निर्भय योजना दिली. नळ कनेक्शनधारकांवर असलेल्या पाणीपट्टी करावरील व्याजाची माफी करणाऱ्या लाभदायक असलेल्या निर्भय योजनेचा गेल्या एक महिन्यात केवळ १०० ग्राहकांनी लाभ घेत व्याजाची रक्कम माफ करवून घेतली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला शहरातील घरगुती, औद्योगीक, बिगर घरगुती ग्राहक व नगर परिषदेवर पाणी विक्री रक्कम व त्यावरील व्याज अशी एकूण १० कोटी ६४ लाख ८५ हजार ३०१ रूपयांची थकबाकी वसुल करायची आहे. यासाठी मजीप्राने कंबर कसली असून तीन पथकांकडून कर वसुली मोहीम राबविली जात आहे. मात्र ग्राहकांकडून पैसे काढून घेणे तेवढे सहज नाही. मात्र कोटींच्या असलेली थकबाकीची रक्कम सोडणे शक्य नाही. अशात थकबाकीदारांना थकबाकीची रक्कम भरण्यासाठी प्रोत्साहीत करण्याच्या दृष्टीने शासनाने १६ जानेवारी पासून निर्भय योजना सुरू केली आहे. या योजनेत भाग घेणाऱ्या ग्राहकांच्या पाणीपट्टी करावर आकारण्यात आलेल्या व्याजाची रक्कम पूर्णपणे माफ केली जाणार आहे. यासाठी योजनेला मुदतवाढ दिली असून आता ग्राहकांना येत्या ३१ जुलैपर्यंत त्यांच्याकडील संपूर्ण थकबाकी भरावयाची आहे. मजीप्राचे एकूण ११ हजार ३०० ग्राहक आहेत, तर नगर परिषदेचे आजघडीला ५० सार्वजनिक नळ कनेक्शन्स आहेत. विशेष म्हणजे नगर परिषदेचे २९० सार्वजनिक नळ होते. मात्र सन २००९ मध्ये मजीप्राने त्यात कपात करून ९० वर आणले. सन २०१३ मध्ये ७० कनेक्शन केले. २०१४ मध्ये आणखी कमी करून आज ५० सार्वजनिक नळ आहेत. (शहर प्रतिनिधी)तीन पथकांमार्फत वसुलीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणने सुरू केलेल्या निर्भय योजनेचा आतापर्यंत १०० ग्राहकांनी लाभ घेतला आहे. लाभ घेणाऱ्या या त्या ग्राहकांकडून मजीप्राला सुमारे २.५० लाख रूपये प्राप्त झाले असून ग्राहकांची सुमारे पाच लाख रूपयांची व्याज माफी झाली आहे. थकबाकीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी मजीप्राने तीन पथक तयार केले असून ते कर वसुली मोहीम राबवित आहेत. व्याज माफीच्या या मोहिमेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही केले जात आहे. निर्भय योजनेचे स्वरूप या योजनेंतर्गत थकबाकीदाराकडे (नळकनेक्शधारक) थकित असलेल्या पाणीपट्टी करावर आकारण्यात आलेल्या व्याजाच्या रकमेची माफी केली जाणार आहे. यासाठी थकबाकीदारांनी आपले नाव मजीप्राकडे नोंदवायचे आहे. थकबाकीदारांना ही योजना लागू झाल्यापासून पूर्ण कालावधीत एकरकमी रक्कम भरण्याची मुभा असेल, मात्र यासाठी कार्यालयात उपलब्ध विहीत प्रपत्रात निर्भय योजनेत सहभागी होणे आवश्यक राहील. ज्या थकबाकीदारांकडील पाणीपट्टी विलंब आकारासह थकीत आहे व असे ग्राहक जे मूळ पाणीपट्टी रक्कम पूर्णत: म्हणजेच १०० टक्के भरतील, त्यांनाच निर्भय योजनेत १०० टक्के माफीचा लाभ मिळेल. ज्या ग्राहकांनी याआधी मुळ रक्कम भरली आहे व त्यांच्याकडे व्याजाची रक्कम असल्यास त्या ग्राहकांनाही १०० टक्के व्याजमाफीचा लाभ घेण्यासाठी या योजनेत सहभागी होणे आवश्यक आहे. अन्यथा अशा ग्राहकांची नळ जोडणी कापण्याची मोहीम सुरू होणार आहे.