......
या सेवा राहणार सुरू
रुग्णालये तपासणी, निदान केंद्रे, रुग्ण तपासणी केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालय, औषधनिर्माण कार्यशाळा, औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या, औषधी विक्री केंद्र आणि वैद्यकीय क्षेत्राशी निगडित आस्थापना आणि उपक्रम. किराणा माल दुकान, भाजी विक्रीची दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई विक्रीची दुकाने, खाद्यपदार्थ विक्री केंद्र, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था रेल्वे, टॅक्सी, ऑटो, सार्वजनिक वाहतूक बसेस. विविध देशाच्या राजकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजाशी निगडित सेवा, स्थानिक प्रशासनाद्वारे करावयाची मान्सूनपूर्व कामे, स्थानिक संस्थेद्वारे पार पाडल्या जाणारी सर्व सार्वजनिक स्वरूपाची कामे, मालवाहतूक, शेतीक्षेत्राशी निगडित सेवा, ई-कॉमर्स, प्रसार माध्यमे, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने अत्यावश्यक केलेल्या सेवा सुरू राहणार आहेत.
.........
हे राहणार बंद
दुकाने, बाजारपेठा, मॉल्स इत्यादीबाबत : अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद राहील.
.....
कार्यालये :- सर्व खासगी कार्यालये बंद राहतील. मात्र सुरू राहणाऱ्या कार्यालयामध्ये सहकारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व खासगी बँका, विद्युत पुरवठा संबंधित कंपन्या, टेलिकॉम सेवा, पुरवठादार, विमा, मेडिक्लेम कंपनी, औषधी उत्पादन, वितरण व्यवस्थापनासाठी असलेली कंपनी कार्यालये यांचा समावेश आहे. शासकीय कार्यालये ५० टक्के उपस्थिती क्षमतेने चालू राहतील.
.........
सिनेमागृहे बंद राहतील, नाटक थिएटर आणि प्रेक्षागृहे बंद राहतील. मनोरंजन पार्क, आर्केड, व्हिडीओ गेम पार्लर बंद राहतील. पाण्याची उद्याने बंद राहतील. क्लब, जलतरण तलाव, व्यायामशाळा व क्रीडा संकुल बंद राहतील.
...............
रेस्टारंट, हॉटेल : सर्व प्रकारचे रेस्टारंट बंद असतील. सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत खाद्यपदार्थांची ऑर्डर, पार्सल आणि घरपोच सेवा सुरू ठेवता येईल. कोणत्याही हॉटेल रेस्टॉरंटमध्ये ऑर्डरकरिता भेट देता येणार नाही. हॉटेलमधील उपलब्ध जेवण्याची व्यवस्था केवळ हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तींकरिता असेल.
...............
धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे : धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे बंद राहतील. प्रार्थना स्थळांमध्ये सेवा देणाऱ्या व्यक्तींनी मंदिराच्या आत पूजाअर्चा करण्यास परवानगी असेल. परंतु कोणत्याही बाहेरील व्यक्तीला प्रवेश देण्यात येऊ नये. अशा स्थळी काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना सल्ला देण्यात येतो की, त्यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार लसीकरण करून घ्यावे, जेणेकरून असे स्थळ पुन्हा खुले करण्यासाठी सोपे जाईल.
.........
सलून दुकाने, स्पा,ब्युटी पार्लर दुकाने :- सलून दुकाने, स्पा,सलून व ब्युटी पार्लर पूर्णत: बंद राहतील. अशा स्थळी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, जेणेकरून अशी दुकाने पुन्हा खुले करण्यासाठी सोपे जाईल.
.........
वृत्तपत्र : वर्तमानपत्रांची छपाई व वितरण सर्व दिवस करता येईल. घरपोच सेवा सर्व
दिवशी सकाळी पेपरचे वितरण करण्यास परवानगी असेल. वृत्तपत्र वितरण ही अत्यावश्यक सेवेत समाविष्ट आहे.
..............
शाळा व महाविद्यालये:- सर्व शाळा व महाविद्यालये बंद राहतील. यात दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना सूट देण्यात आली आहे. सर्व प्रकारचे खासगी शिकवणी वर्ग बंद राहतील.
......
धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांबाबत :- कोणत्याही धार्मिक, सामाजिक,
सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांना परवानगी राहणार नाही. लग्न समारंभात जास्तीत जास्त ५० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी राहील. अंत्ययात्रेत जास्तीत जास्त २० व्यक्ती सहभागी होऊ शकतील आणि अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या व्यक्तीचे पूर्ण लसीकरण होणे आवश्यक आहे.
..........
रस्त्याच्या कडेला, फूटपाथवरील खाद्य दुकानांबाबत : अशा दुकानात कोणत्याही खाद्यपदार्थाची थेट
विक्री करता येणार नाही. पार्सल सुविधा व घरपोच सेवा देता येईल. अशी दुकाने दर दिवशी सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंतच सुरू राहतील.
.....................