शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामाला हिरवी झेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 22:51 IST

शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून या पुलावरुन वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा पूल पाडून या ठिकाणी नवीन उड्डाणपूल तयार करण्यात यावा. यासाठी आ.गोपालदास अग्रवाल यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.त्याला यश आले असून नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी शासनाने ८३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विशेष म्हणजे हा मुद्दा लोकमतने सर्वप्रथम लावून धरला होता.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ८३ कोटी रुपयांचा निधी मंजूर : सर्वेक्षणासाठी मिळाला निधी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून या पुलावरुन वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा पूल पाडून या ठिकाणी नवीन उड्डाणपूल तयार करण्यात यावा. यासाठी आ.गोपालदास अग्रवाल यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.त्याला यश आले असून नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी शासनाने ८३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विशेष म्हणजे हा मुद्दा लोकमतने सर्वप्रथम लावून धरला होता.गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना रेल्वे उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल तयार करण्यासाठी शासनाने २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ८३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. नवीन उड्डाणपुलाचे बांधकामाला लवकारात लवकर सुरू करण्यासाठी त्वरीत सर्वेक्षण करण्याकरीता २ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत केला आहे. त्यामुळे गोंदिया शहरात नवीन उड्डाणपूल तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाचे बांधकाम हे ८० ते ९० वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. तर या पुलावरील रहदारीत सुध्दा वाढ झाली होती. त्यामुळे हा उड्डाणपूल वाहतुकीस धोकादायक असल्याचे पत्र रेल्वेने जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते.त्याचीच दखल घेत या उड्डाणपुलावरुन जडवाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. केवळ दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना या पुलावरुन प्रवेश दिला जात होता. रेल्वेने हा उड्डाणपूल सहा महिन्यात पाडून नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात यावे असे पत्र जिल्हा प्रशासनाला दिले होते. दरम्यान जुन्या जीर्ण झालेल्या उड्डाणपुलाची समस्या लक्षात घेवून आ.गोपालदास अग्रवाल यांनी हा जीर्ण उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल बांधकामाची मागणी शासनाकडे केली होती. तसेच यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्याचीच दखल शासनाने २०१९-२० च्या अर्थसंकल्पात नवीन उड्डाणपूल बांधकामासाठी ८३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे नवीन उड्डाणपूल बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. तर शहरवासीयांची समस्या सुध्दा मार्गी लागली आहे. याबद्दल आ.अग्रवाल यांचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, अ‍ॅड.के.आर.शेंडे, गोंदिया-भंडारा लोकसभा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल, शहरध्यक्ष अशोक चौधरी, चेतना पराते, दीपक नशिने, राकेश ठाकूर, गौरव वंजारी, पन्नालाल सहारे, आलोक मोहंती यांनी आभार मानले आहे.वर्षभरात करा बांधकाम पूर्णगोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम वर्षभरात पूर्ण करा असे निर्देश आ.गोपालदास अग्रवाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.लोकमतने वेधले सर्वप्रथम लक्षशहरातील जुन्या जीर्ण झालेल्या उड्डाणपुलाचा प्रश्न सर्वप्रथम लोकमतने लावून धरला होता. त्यानंतर हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी कसा धोकादायक आहे ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. त्याचीच दखल घेत शासनाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. तसेच लोकमतने जुन्या जीर्ण उड्डाणपुलाचा मुद्दा सातत्याने लावून धरल्याने शासन आणि प्रशासनाने सुध्दा त्याची दखल घेतली हे विशेष.जुना उड्डाणपूल पाडण्याला लवकरच सुरूवातगोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल पाडण्याची प्रक्रिया निधीअभावी रखडली होती. मात्र शासनाने आता निधी मंजूर केल्याने जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्याचा मार्ग सुध्दा मोकळा झाला आहे. लवकरच जीर्ण उड्डाणपूल पाडण्यास सुरूवात केली जाणार आहे.