शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे होतेय दुर्लक्ष : पॉझिटिव्हच्या संपर्कातील सहा जणांची चाचणीच होत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 05:00 IST

जिल्ह्यात एका रुग्णामागे ८ जणांचे ट्रेसिंग केले जात आहे. तर रुग्णसंख्या वाढल्याने आता हे प्रमाण एका रुग्णामागे १५ करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १० खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. मात्र, खासगी प्रयोगशाळांकडून वेळीच माहिती उपलब्ध होत नसल्याने ट्रेसिंग करण्यास अडचण निर्माण होत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देबाधित रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ :टेस्टचे प्रमाण वाढले, आरोग्य विभागाचे नियोजन ढासळले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात मार्च महिन्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला. मार्च महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दीड हजारावर गेला. बाधितांचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्यात आले. मात्र ट्रेसिंग फार कमी प्रमाणात होत असल्याने कोरोना संसर्गात वाढ होत असल्याचे बोलले जाते. जिल्ह्यात एका रुग्णामागे ८ जणांचे ट्रेसिंग केले जात आहे. तर रुग्णसंख्या वाढल्याने आता हे प्रमाण एका रुग्णामागे १५ करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १० खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. मात्र, खासगी प्रयोगशाळांकडून वेळीच माहिती उपलब्ध होत नसल्याने ट्रेसिंग करण्यास अडचण निर्माण होत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या पाच ते सहा जणांची चाचणी होत नसल्याने ते इतरांच्या संपर्कात येत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा तीन आकडी पाढा सुरू झाला आहे. याला प्रतिबंध लावण्यासाठी टेस्टिंग, ट्रेसिंगवर भर देण्याची गरज आहे.  

दररोज दीडशे जण पॉझिटिव्ह, चाचण्यांच्या संख्येत वाढ जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आलेख सातत्याने वाढत आहे. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले असून, दररोज दोन हजारांवर चाचण्या होत आहेत. यातील किमान दीडशे जण दररोज पॉझिटिव्ह येत आहेत. कोरोनाबाधितांचा वाढता ग्राफ लक्षात घेता आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण एका रुग्णामागे १५ असे करण्यात येऊन त्यांची चाचणी करण्यात येणार आहे.ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव वाढल्याने आता ग्रामीण भागातसुद्धा कठोर उपाययोजना आणि टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांवर बारीक नजर ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.  

हा घ्या पुरावाअर्जुनी मोरगाव तालुक्यातील झाशीनगर गावात एकाच दिवशी तब्बल ३६ रुग्णांची नोंद झाली. यापैकी दोन रुग्ण हे इतरांच्या संपर्कात आले; पण त्यांचे ट्रेसिंग वेळीच न झाल्याने कोरोना संसर्गात वाढ झाली आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे दुर्लक्ष केल्याने आणि माहिती लपविल्यानेसुद्धा या ठिकाणी कोरोना संसर्गात वाढ झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे ट्रेसिंगवर अधिक भर देण्याची गरज आहे. शहरातील छोटा गोंदिया परिसरातील एका रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला. या रुग्णाच्या संपर्कात २० ते २५ जण आले. पण, त्यापैकी सात ते आठ जणांचीच कोरोना चाचणी करण्यात आली. संपर्कात आलेल्या उर्वरित १० ते १२ जणांची चाचणीच करण्यात आली नसल्याचे समजते आहे. परिणामी, कोरोना संसर्गात वाढ होण्यास मदत होत आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या